ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स च्या माध्यमातून आदिवासी मुलांना गमंतीचे खेळ व खाऊ देऊन त्यांना दिले आनंदी क्षण

July 25, 202213:04 PM 17 0 0

उरण (तृप्ती भोईर ) : शनिवार दिनांक २३ जुलै २०२२ लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स च्या अध्यक्षा लायन गौरी देशपांडे व आदिवासी ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन ला. वर्षा लोकरे यांनी पिरवाडी आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद च्या अंगणवाडी परिसरात आदिवासी वाडीतील मुलांना ससा उडी स्पर्धा व खेळ घेऊन,  बडबडगीते व अभिनय गीते शिकवली व खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले व आनंदाचे क्षण दिले.
सरपंच हरेश कातकरी साहेब व सूरज ठवले साहेब यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
अंगणवाडी सेविका सौ वैशाली पाटील मॅडम व आशा वर्कर ताई यांनीही सहकार्य केले.
आदिवासी वाडीतील महिला वर्गाशी सम्पर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समुद्र किनारी व डोंगरावर असलेल्या या दुर्गम विभागातील आदिवासी वाडीत लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स ने वेळोवेळी आम्ही आपले योगदान देत राहू असे सांगितले.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *