ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

थॉयराइड

December 5, 202017:39 PM 211 0 3

थॉयराइडबद्दल अनेक गैरसमजही आहेत. थॉयराइडची समस्या गळ्यात असलेल्या थायरॉइड ग्रंथी आणि त्यातून स्त्रावित होणाऱ्या हार्मोन्सवर अवलंबून आहेत. जाणून घ्या ‘थायरॉइड’बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी

डॉ शिवाजी काळेल (MD.BAMS)

१. थायरॉइड एक असा आजार आहे ज्यामुळं रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचारासह विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा.

२. हा आजार आपल्या हाडांवरही परिणाम करतो. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन सप्लीमेंट आणि कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं.

३. थायरॉइडची समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीवरही परिणाम करते. सोबतच कोलेस्ट्रॉल वाढून आपल्याला हृदयाचे आजारही होऊ शकतात. ४. हा आजार ३० वर्षांनंतर महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. काही प्रकरणांमध्ये यापेक्षा कमी वयाच्या स्त्रियांनाही या समस्येचा सामना करावा लागतो. ६०च्या वयापर्यंत प्रत्येक पाच पैकी एका महिलेला थायरॉइडची समस्या असते.

५. लहान वयात थायरॉइड झाल्यास मासिक पाळी अनियमित येते. तर कधी रक्तस्त्राव थांबतो आणि गरोदरपणाची क्षमताही कमी होते.

६. हायपर थायरॉइडच्या रुग्णांना उन्हाळ्यात खूप जास्त गरम होतं आणि त्यांचं मेटॅबॉलिझम वाढतं. हेच कारण आहे त्यांना घाम खूप जास्त येतो. तर हायपो-थायरॉइडमध्ये रुग्णांना हिवाळ्यात खूप जास्त थंडी वाजते आणि त्यांचं जेवण कमी होतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो। धावपळीची जीवनशैली आत्मसात करणार्‍या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय. थायरॉईडच्या 100 रुग्णांमध्ये 80 रुग्ण या महिला असतात, असं एका अध्ययनातून समोर आलंय.
थायरॉईड तीन प्रकारचे असतात परंतु यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो म्हणजे हायपोथारयाइडिज्म. रक्ताची चाचणी झाल्यानंतरच या प्रकारच्या थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत मिळतात.

आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉईड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉईड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात . जेव्हा तुम्ही थोडं जास्त काम केलं तरी तुम्हाला थकावटीची जाणीव होते किंवा तुमचं वजन अचानक वाढायला लागतं किंवा शरीराच्या विविध भागांत मंद-मंद दुखायला लागतं किंवा त्वचा आणि केसांमध्ये कडकपणा जाणवायला लागतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे नेहमी ताण-तणावात दिसू लागता तर समजून जा की तुम्हालाही हायपोथायराइडिज्मची समस्या आहे.

यावर उपाय म्हणजे, कॅफीन आणि शर्करेचं प्रमाण एकदम कमी करा. याशिवाय, शरीरात शर्करेचं प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची कार्यप्रणाली सामान्य केली जाऊ शकते. या आजारात वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा रुग्ण फॅट सोडून देतात यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची जरुर काळजी घ्या.

थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनानं दूर होऊ शकतात. या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा. थायरॉईड ग्रंथी घश्यात असतात. त्यातून शरीरासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स रिलिज होत असतात. पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉईड कॅन्सरचा धोका जास्त असतो. उपाय
साखरेचं कमी प्रमाणात सेवन करा. शरीरात साखरेचं प्रमाण वाढवणार्‍या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा.
आहारात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिन्स थायरॉईड हार्मोन्सला टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची समस्या कमी होऊ शकते.

अनेकदा या आजारात वजन वाढतं. तेव्हा महिला फॅटयुक्त आहार घेणं सोडून देतात. यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची काळजी घ्या. मादक पदार्थांचे सेवन करू नका. आर्यन असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घ्या.कांचनार गुग्गुळ, आरोग्य वर्द्धिनी वटी यासारखी आयुर्वेदिक औषधं वापरून व विदधाग्नी व पंचकर्मं उपचाराने आपण थायरॉईड पूर्ण बरा करू शकतो.

 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
डॉ शिवाजी काळेल (MD.BAMS)
प्लॉट नं 5/के /9, रोड नंबर 1
साई सिद्धी पंचकर्म सेंटर
शिवाजीनगर, गोवंडी. मुंबई – 400043

Categories: आरोग्य, लेडीज स्पेशल
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *