ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

*टायगर है और रहेगा *

May 11, 202119:55 PM 96 0 0

कहां पर तूफान अभी ज़िंदा है, 

जज्बात में जान अभी जिंदा है, 

सागर खामोशी में भी सागर ही रेहता है, 

लहरों से कहता है वो ज़िंदा है, 

भीतर तूफान अभी ज़िंदा है, जज्बों में जान अभी जिंदा है … टायगर अभी जिंदा है।

 

सध्या करोनाच्या कालखंडात दुपारी झोपण्याची सवय लागली आहे आणि नेहमी प्रमाणे काल ही दुपारी ३.३० वा झोपलो तोच फोन वाजायला लागला तो silent vibrate मोडवर होता , नेहमी प्रमाणे कुणीतरी करत असेल बघु थोड्यावेळात असा विचार करत होतो तेवढ्यात पुन्हा पुन्हा vibration चा आवाज येतच होता शेवटी कुणीतरी जवळचच फोन करत आहे याची जाणीव झाली ,हल्ली फोन उचलण्याचीही भीतीच वाटते या कोरोना मुळे कुणीतरी सोडुन गेल्याची किंवा कुणाला तरी हॅास्पिटल मध्ये दाखल करुन घेण्यासंदर्भातच कॅाल असतात .सध्या ह्या सर्व प्रकरणात आपण काहीच करु शकत नाही ,त्यामुळे फोन उचलायचा व काय उत्तर द्यायच हा प्रश्न समोर असतो , काय झाल असेल ?  ह्या संभ्रमावस्थेत फोन घेतला तर जवळजवळ २५ मिस कॅाल व त्यातील अनेक कॅाल हे पत्रकारांचे थोडावेळ कळेणास झाल कि नक्की काय झाल? हे सगळे कॅाल का करत आहेत ? मनात काहुर माजल तोच एका पत्रकाराचा सुधाकर कश्यप यांचा फोन वाजला तो उचलला तो तिकडुन बोलला अरे विजय कुठे आहेस ? तु मी बोललो घरी , तेव्हा तो बोलला बातमी येत आहे ती खरी आहे का ? मी ताडकन उभाच राहीलो बोललो कोणती बातमी तो म्हटला अरे तुझा  सासरा नाना यांची हे ऐकुन मला काही सुचेनाच फोन वर तो बोलत होता त्याला मी म्हटले बघतो माहीती घेतो व फोन ठेवला अनेक फोन वाजत होते पण माझी डेरिंगच होत नव्हती फोन घेण्याची , प्रियाला  कस सांगायच ती काय रिॲक्ट करेल हा ही एक मोठाच प्रश्न होता माझ्यासमोर , तसेच एक मन मात्र मानायला तयार नव्हत अस काही झाल असेल ही अफवाच असावी … मामा असे याप्रकारे आपल्याला सोडुन जाणार नाहीत .

माझ्या डोक्यात काही वेगळच चालु होत , मला मागे त्यांच्यावर माझ त्यांच्या पुतणीशी म्हणजे प्रियाशी लग्न होण्या आधीचा झालेला बॅंकॅाक मधील हल्ला आठवला व नंतर झालेल्या चित्रपटात शोभतील अशा घटना व छोटा राजन सही सलामत आहे हे जाहीर झाल मला आशा होती की आजही तसेच व्हाव व मी दिल्ली मध्ये व इतरत्र फोन करुन माहीती करुन घेवु लागलो तोच दिल्लीतील एका मित्रांने सांगितले की ANI news वर बातमी येत आहे की नाना व्यवस्थित आहेत . तेव्हा जीवात जीव आला .

मग तोपर्यंत नाना म्हणजेच राजेंद्र सदाशिव निकाळजे हे व्यवस्थित आहेत ही बातमी तेवढ्याच जोरात पसरली जेवढी आधीची . त्यांचे बंधु माझे छोटे सासरे दिपकभाऊ निकाळजे यांच्याशी ही संपर्क झाला ते ही बोलले की हि अफवाच होती . संपुर्ण समाज माध्यमावर नाना लवकर बरे व्हा / King is alive / टायगर अभी जिंदा है अशा पोस्ट येवु लागल्या .

ह्या माणसाचा स्वत:चा एक फॅालोअर आहे दाऊद या देशद्रोह्याविरोधातील घेतलेल्या भूमिकेमुळे देशातील सर्व देशप्रेमी तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे , नाना देशभक्त आहे व जय हिंद हा त्यांचा नारा आहे व त्याला प्रतिसाद हि तरुणाई देत असते जय हिंद नेच .

त्यांच पुर्वायुष्यावर आपण भाष्य करु शकत नाही कारण त्याविषयी मला तरी जास्त माहीत नाही परंतु मागच्या १६ वर्षांच्या निकाळजे परिवाराचा जावई म्हणुन नानांशी झालेल्या संपर्कातुन एक गोष्ट नक्की जाणवली ती म्हणजे नाना हे संपुर्ण कुटुंबावर प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे , कुणाच्याही गरजेला उभ राहणार संपुर्ण कुटुंबावर त्यांच्या प्रेमाची सावली सातत्यान जाणवते .

२००५ मध्ये त्यांची पत्नी सुजाता निकाळजे व माझे सासरे दिवंगत प्रकाश निकाळजे यांना ज्यावेळेस जाणिवपुर्वक अटक करण्यात आली त्यावेळी नानांना किती प्रचंड दु:ख झाले होते हे सर्व कुटुंबाने पाहीले आहे . नंतर २०११ मध्ये त्यांचे मोठे भाऊ प्रकाशदादा निकाळजे यांच्या निधनान तर ते खुपच व्याकुळ झाले होते , कारण ते त्यांच्या दादांना त्यांच्या वडीलांसारखेच समजत होते . त्यानंतर त्यांच्या आईच निधन झाले हे सर्व धक्के ते एकटेच सहन करत होते आमच्या नातेवाईकांच्या आजुबाजुला तरी जवळचे लोक होते ते मात्र हे सर्व एकाकी सहन करत होते . त्यांचा ही सहनशक्ती कुटुंबाला आधार देणारी नेहमीच राहीली आहे .

हे सर्व होत असताना देशविघातक कारवाया करत असलेल्या देशद्रोही शक्तींसोबत त्यांचा संघर्ष  चालुच आहे .

१९९३ च्या बॅाम्बस्फोट आरोपींना धडा शिकवण्याचं त्यांच काम चालुच आहे , या देशासाठी करत असलेल्या कामासाठी अनेकदा त्यांच्यावर हल्ले झाले मात्र ह्या सर्व हल्ल्यातुन अनपेक्षितरित्या सुखरुपरित्या बाहेर पडले हे त्यांच्या देशभक्तीला एक मिळालेल बक्षिसच आहे .

खरतर नानांनी समाजातील अनेक घटकांना मदतीचा हात दिला आहे , त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या आहेत , त्यांच्या जन्मगावातील अनेकांना त्यांनी सहकार्यांचा हात पुढ केला आहे , एक सामाजिक कार्यकर्ता म्हणुन तर त्यांचा चेहरा आहे हे देखील याठिकाणी स्पष्ट करावंसं वाटत . त्यांच संपुर्ण कुटुंब आज सामाजिक व राजकिय जीवनात असलेल दिसत त्यांचा लहान भाऊ दिपकभाऊ निकाळजे त्यांची मोठी बहिण सुनिताताई चव्हाण व कुटुंबातील अनेक सदस्य हे देखील आज आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत त्यांनी देखील आपल राजकीय सामाजिक योगदान  दिल आहे . व आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे .

मागच्या काही वर्षांपूर्वी राजेंद्र निकाळजे नाना यांना बाली येथे भारतीय सुरक्षा यंत्रणेने CBI ने आपल्या ताब्यात घेतले तेव्हापासुन ते तिहार मध्ये आहेत व व्हिडीयो कॅान्फरसिंग च्या माध्यमातुन चाललेल्या अनेक खटल्यातून त्यांची दोषमुक्त सुटका देखील झाली आहे , अनेक खटले चालु आहेत मात्र २२ एप्रिल २१ रोजी त्यांना तिहार जेलमध्ये कोरोनाची लागण झाली व त्यातुन ते बरे होत आहेत अशी बातमी येत असतानाच काल त्यांच्या निधनाची अफवा प्रसारमाध्यमावर प्रसारित झाली व संपुर्ण देश व्याकुळ झाला व थोड्याच वेळात पुन्हा AIIMS ने जाहीर केले की नाना व्यवस्थित आहेत योग्य उपचार चालु आहेत व ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत .

हे वाचुन आनंद झाला , हे सर्व होत असतानाच ७० च्या दशकातला डॅान सिनेमा व त्यातील डायलॅाग आठवला —— तुम लोग ये भुल गये , डॅान जख्मी हुआ तो क्या हुआ डॅान डॅान है ।

अशा ह्या डॅानच राहीलेलं काम त्यांच्या हातून लवकरच व्हावे हिच त्यांना शुभेच्छा ते लवकरच बरे होतील .

                         (  डॅा.विजय मोरे)

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *