ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देशाला समृध्द करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज – भदंन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर

December 9, 202009:53 AM 81 1 0

जालना (प्रतिनिधी)  देशाला समृध्द आणि संपन्न करायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गरज आहे असे प्रतिपादन भदंन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांनी केले. नालंदा बुध्द विहार संघभुमी नागेवाडी जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमीत्त आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. जालना तालुक्यातील नालंदा बुध्द विहार संघभुमी नागेवाडी जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त त्यांच्या प्रतिमेस विनंम्र अभिवादन करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भदंन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर, भदंन्त शिवली यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, आपल्या देशाला समृध्द आणि संपन्न करायचे असेल तर बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही. बाबासाहेबांचे व माता रमाईचे आपल्यावर माय बापाहुन अधिक उपकार आहेत. त्यांच्या उपकाराची जाण ठेवून आपण सदाचरणी बनले पाहिजे. आजही बाबासाहेबांचे संविधान आधुनीक भारतासाठी प्रेरणास्त्रोत आहे. माता रमाईच्या त्यागामुळे बाबासाहेबांनी आधुनीक भारताच्या पायाभरणीमध्ये अतुलनीय योगदान दिले आहे. या महाप्रयान दिनानिमीत्त भंन्तेजी असेही म्हणाले की, महापरिनिर्वाण शब्ध फक्त बुध्दांसाठी आहे. तर बाबासाहेबांना महाप्रयाण असा शब्द योग्य आहे. महापरिनिर्वाण हे बुध्दांचेच होते. तर बोधिसत्वाचे महाप्रयाण होते असा शब्द भेद करुनही भंन्तेजी यांनी उपासक उपासिका यांना मार्गदर्शन केले.
या महाप्रयाण दिनानिमीत्त नालंदा बुध्द विहार येथे अनेक महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. त्यामध्ये सम्राट अशोक, शिवाजी महाराज, शाहु महाराज, माता जिजाऊ, सावित्रीबाई, माता रमाई यांनाही आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान नालंदा बुध्द विहारामध्ये भंन्तेजी यांनी संडे मेडीटेशनचे आयोजन केले होते. त्यालाही उपासक उपासिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात छायाताई हिवाळे, सरिता जगताप, जोगदंड, बेडैकर, रत्नपारखे आई, महेंद्र रत्नपारखे, पैठणे, इंदूबाई गायकवाड, संघरत्न लांडगे, साळवेताई, म्हस्के ताई, जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Comments
  1. -

    Nice

Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *