ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शाळेचा आज पहिला दिवस पण जे. एन. पी.टी प्राथमिक विद्यालय इंग्रजी माध्यम उरण शाळेच्या गेटला भले मोठे टाळे

December 17, 202113:09 PM 75 0 0

उरण रायगड (तृप्ती भोईर) :  आपण पहातोय २०२० च्या मार्चमध्ये भारतात आलेली एक महाभयंकर महामारी ,अतिशय जलद गतीने संक्रमित होणारी ही महामारी कोरोना होय. आणि खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला या अनुषंगाने शाळा, कॉलेज, तात्काळ बंद करण्यात आले. आणि तेव्हा पासुन आज जवळजवळ दोन वर्षे पुर्ण होत आहेत शाळा बंद होवून. आणि आज १६ डिसेंबर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार जे. एन पी.टी प्राथमिक विद्यालय इंग्रजी माध्यम सुरू होणार होते. परंतु आर. के.एफ. या संस्थेने शाळेच्या पहिल्या च दिवशी शाळेच्या गेटला भले मोठे टाळे लावले.

आज ३२ वर्षापुर्वी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्रशासनाने इंडीयन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला जे. एन. पी.टी विद्यालय चालविण्यासाठी दिले होते. या विद्यालयात जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मुले शिकण्यासाठी येत होती .अर्थात तो त्यांचा मुलभूत अधिकार ही आहे. याला कारण जवाहरलाल नेहरू पोर्ट हे प्रकल्पग्रस्तांच्या जागा संपादित करून त्यावर उभारलेले आहे. त्यामुळे हे विद्यालय मुख्यता प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे आहे. आणि आतापर्यंतचा शाळेचा भुतकाळ म्हणा अथवा इतिहास म्हणा पण येथे शिकलेले विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत याशिवाय अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी तेथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत आज सांगण्यास अभिमान वाटत आहे की, प्रत्येक क्षेत्रात येथील विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे. कितीतरी खेळाडू चित्रकार, जागतिक पातळीवर चमकले आहेत. एकुण काय तर इंडीयन एज्युकेशन सोसायटीचे हे जे.एन. पीटी विद्यालय म्हणजे सरस्वती चे माहेरघर असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

पण अस म्हणतात दुधात एखादा मिठाचा खडा पडावा तस काहीस जुलै २०१९ मध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ची ही आय. इ. एस या संस्थेची ही शाळा आर के. एफ या संस्थेस चालविण्यासाठी दिली. कोणतीही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता जे. एन. पी.टी कडून हे विद्यलय आर के. एफ संस्थेस हस्तांतरण करण्यात आले आहे. आणि तेव्हापासून या संस्थेने शाळेचा ताबा घेतला आहे. याशिवाय या शाळेत सी. बी. एस. ई .बोर्ड अभ्यासक्रम राबविण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
याचा परिणाम असा झाला आहे की, येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे बरेचसे प्रकल्पग्रस्त आहेत पण आज जवळपास तीन वर्षे होतील पण त्यांना पगारही वेळेवर होत नाहीत‌. शिक्षकांना पगार, ग्रॅज्युइटी, पी. एफ दिला जात नाही. रिटायर्ड शिक्षकांना ही अजुनपर्यंत त्यांचा पी‌ एफ ग्रॅज्युइटी रक्कम जमा झालेली नाही. आणि अजुन एक संतापजनक प्रकार म्हणजे याच शाळेतील आर. के .एफ. संस्थेला कोणताही अधिकार नसताना सहा शालेय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आज तीन वर्षे झाली ते पगारापासुन वंचीत आहेत. पगाराची पे स्लीप नसल्याने १६ नं A हा फार्म न दिल्याने येथील शिक्षक कर्मचाऱ्यांना बॅंकेचे लोण घेता येत नाही. गेली दोन वर्षे झाली या प्राथमिक विद्यालय इंग्रजी माध्यमातून कोणतीही प्रवेश प्रक्रिया होत नाही. हजारों प्रकल्पग्रस्त मुले त्यांचा हक्काच्या प्रवेश प्रक्रियेपासुन दुर लोटली गेली आहेत.
निलंबित केलेल्या सहा कर्मचारी मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. पुर्ण शाळेतच मुख्य ता महिला शिक्षक भगिनींची संख्या जवळपास ७० टक्के आहे. आतापर्यंत दहा वर्षे बारा वर्षे नोकरी केलेल्या शिक्षिकेंनी लोण घेतले आहे तर आता पुढील या अशा परिस्थितीला त्या कश्या तोंड देतील? आज पहातोय महागाई गगनाला भिडली आहे. सॅलरी स्लीप नसल्याने मुलांना एज्युकेशन साठी पुढे पाठविण्यास पैशाची पुर्तता करण्यात अनेक अडचणी येत आहेत.शिक्षणासाठी बाहेर पाठवता येत नाही दहा दहा बारा बारा वर्षे नोकरी झालेल्या शिक्षिकेंना अजुनही कायमस्वरूपी नोकरीत रुजू केले गेले नाही.कॉन्टॅक्ट बेसवर या शिक्षिका काम करत आहेत दरवर्षी नवीन नेमणूक करून घेत आहेत, सुट्ट्या ही नाहीत, आजारी असतानाही पगार कापला जात आहे. कोरोना सारख्या अर्थिक अन मानसिक संकटाच्या काळात बारा ते तेरा हजार मासीक अल्प वेतनावर त्यांच्याकडून काम करून करून घेतले जात आहे. जे.एन पी.टी प्रशासनाकडून ५० टक्के फी प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांस मिळत होती तीही बंद झाली आहे. आत्ताच या शाळेची अशी अवस्था आहे तर प्रकल्पग्रस्तांची पुढील पिढी ला शिक्षण कसे मिळणार? आज या शाळेतील काही शिक्षिका ह्या सिंगल पॅरेंट्स आहेत त्यांचे कसे होणार? याशिवाय स्थानिक भूमिपुत्रांना या शाळेच्या संस्था व्यवस्थापनाने काडीमोल ठरविले आहे तर मग इथे काम तरी कोण करणार? असे अनेक प्रश्न या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेडसावत आहेत.
रिटायर्ड नंतर बऱ्याच लोकांचे भविष्यकाळात पुढे नियोजन म्हणा किंवा रिटायर्ड नंतर प्लान ठरलेले असतात पण एकही पैसा हाती न आल्याने आज एवढे वर्षं इमान इतबारे शिक्षणक्षेत्रातील ही सेवा त्यांची निर्थक ठरली आहे असे त्यांना वाटत आहे. साठीनंतरचे हे वय टेन्शन घेवुनच सेवानिवृत्त होत आहे. पुर्ण पगार हातात येत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यासाठी साफसफाई, शाळा सॅनिटराइजही केली नाही आज पहिलीपासून येणारी लहान मुले, आणि शाळा अशी अस्वच्छ. याशिवाय शाळेचा पहिला दिवस म्हणजे मुलांना उत्सुकता, व आनंद मनात निर्माण करणारा असा असतो ,पण आज शाळेत मुलांना प्रवेश करतानाच गेटला लावलेल्या कुलुपांनी या बालकांचे स्वागत केले. पालक आणि मुलांना आजचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय असा झाला. मुख्य म्हणजे पालकांना – शिक्षकांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे आर .के. एफ संस्थेने शाळेला कुलूप ठोकुन एक मोठे षडयंत्र केले आहे.
जे. एन.पी.टी. शाळेच्या आर.के.एफ या संस्थेच्या अशा या कारभारामुळे सुरुवातीच्या इंडीयन एज्युकेशन सोसायटीमधुन बाहेर गेलेल्या मुलांना भविष्यात शाळेचा दाखला लागलाच तर या शाळेच्या दाखल्यावर नेमका कोणत्या शाळेचा उल्लेख असेल ? विद्यमान विद्यार्थी दहावी इयत्तेतील शाळेच्या परिक्षा अर्जावर कोणत्या शाळेचा नाव असेल ?याचा अर्थ शाळा सोडलेल्या दाखल्यावर जुन्या संस्थेचा उल्लेख नसेल तर त्यांचेही भवितव्य अधांरात असणार आहे. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात आज प्रकल्पग्रस्तांचे जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयाची ही शाळा सापडली आहे . आज या शाळेला कुलुप लावलेला असल्याने शाळेचे शिक्षक, शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, व पालक यांना शाळेच्या गेटसमोर तिष्ठत उभे रहावे लागले. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर, पालक संघटना संघर्ष समितीचे अध्यक्ष किरण घरत, उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी दिनेश घरत , महाराष्ट्र टि.डी.एफ. संघटनेचे कार्याध्यक्ष नरसु पाटील सर व समस्त शिक्षक पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे रायगड जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर यांच्या मध्यस्थीने शाळेचे कुलुप उघडण्यात आले.त्यावेळी शिक्षक- पालक- विद्यार्थी एकजुटीचा विजय असो अशा जयघोषाने शाळेत सर्वांनी प्रवेश केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *