ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आजच्या उर्जेची बचत हेच भविष्यातील उर्जेचे संवर्धन होय – गंगाधर ढवळे

December 18, 202113:24 PM 58 0 0

नांदेड – सूर्य हा उर्जेचा अपारंपरिक स्रोत आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन मानवाने उर्जेची निर्मिती केली आहे. उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन होय असे मत येथील प्रथितयश साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व्यक्त केले. ते राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते. दरवर्षी 14 डिसेंबर हा “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन ” तर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह “म्हणून साजरा केला जातो. सर्व स्तरावरील उपभोक्त्यांना ऊर्जा बचतीचे महत्व अवगत करून देवून दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर अत्यावश्यक वेळीच केला जावा या प्रमूख उद्देशामुळेच या संवर्धन दिनाचे आणि सप्ताहाचे आयोजन केले जाते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयात उर्जा संवर्धन सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

संतोष अंबुलगेकर यांच्या कल्पकतेतून उर्जेची बचत आणि संवर्धन हे विषय देऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, ऊर्जा संवर्धनाचा प्रचार आणि प्रसार करून “राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे महत्व विविध घटकांना पटवून देणे हा या उपक्रमाचा भाग आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारख्या जागतिक स्तरावरील गंभीर समस्येला सामोरे जात असताना ऊर्जेचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ऊर्जा संवर्धनाविषयी सर्व घटकांमध्ये जनजागृती होणं अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर मानवाच्या एकूणच वर्तणुकीमध्ये बदल घडवून आणल्याशिवाय आपल्या वसुंधरेचे रक्षण होणं अशक्यप्राय आहे. यावेळी विद्यार्थ्यांना उर्जा बचत व संवर्धनाची शपथ देण्यात आली.
यावेळी उर्जा संवर्धनाकरिता दैनंदिन जीवनात काय करणे शक्य आहे, याबाबत काही सूचना देण्यात आल्या. गरज नसेल तेंव्हा विद्युत उपकरणे आणि दिवे बंद करणे, वापरात नसेल तेंव्हा विद्युत उपकरणांचे मेन स्वीच बंद ठेवणे, कार्यालयात व घरात सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे ,घरातील आतील भिंतींना व छताला फिक्कट रंग देणे, फ्रिज मध्ये जास्त बर्फ साचु न देणे, तसेच वारंवार दरवाजा उघडु नका. वीजेच्या अती उच्च मागणी काळात म्हणजेच सकाळी 7 ते 11 व सायंकाळी 6 ते 10 या वेळेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या वीज उपकरणांचा वापर टाळावा. वातानुकुलीन यंत्र (ए.सी.) पंख्यापेक्षा 15 पट जास्त ऊर्जा खर्च करते व वॉटर कुलर पेक्षा 7 पट जास्त ऊर्जा खर्च करते. ए.सी. चे तापमाण 25 अंश से. एवढे ठेवावे. प्रकाश योजनेसाठी ऊर्जा बचत करणारे एल.ई.डी. बल्ब व ट्युबचा वापर करावा त्यामुळे 80 टक्के ऊर्जा बचत होते. बी.ई.ई.स्टार लेबल अथवा आय.एस.आय. प्रमाणीत उपकरणांचा वापर करावा व त्याची नियमीत देखभाल करावी. शक्यतो सौर, पवन, बायोगॅस, बायोमास या सारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारीत साधनांचा वापर करावा अशा दैनंदिन जीवनातील ऊर्जा बचतीच्या काही सुलभ सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *