ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पारंपारिक मातीच्या पणत्या, .मातीचे मावळे, शिवाजी महाराजांच्या मूर्तीही दाखल

October 31, 202115:11 PM 64 0 0

उरण ( संगिता पवार ) आनंदाचा व गोड सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा मौज मजा आणि आनंदाचा सण आहे. डिजिटल व रेडिमेडच्या युगात देखील बच्चे कंपनी किल्ले बनविण्यासाठी उत्सुक दिसते. बहुसंख्य गावांमध्ये अजूनही मुले किल्ले बनविण्याच्या विधायक उपक्रमात स्वतःला गुंतवताना दिसतात. यंदा कोरोनाचे सावट आटोक्यात असल्याने रेडिमेड किल्ले, मातीचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेतयांनी सांगितले की मागील वर्षी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. मूल्यांची विक्री निम्म्यापेक्षा अधिकने घटली होती. खूप नुकसान झाले. यंदा मात्र विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे समाधान आहे. किंमती मात्र वाढलेल्या नाहीत. सध्या रेडिमेड किल्ल्यांची चलती आहे. शहरात इमारती, वसाहती आदी ठिकाणी मग हे रेडीमेड किल्ले. लावले जातात. आणि त्यावर मावळे व शिवाजी महाराजांची मुर्ती विराजमान केली जाते. मात्र डोंगर, माळरान व शेतातून लाल किंवा काळी माती घमेल्यात किंवा पोत्यामध्ये टाकून आणायची आणि सर्व मित्र मंडळी मिळून किल्ला बनविण्याची मज्जा काही औरच आहे.

विविध प्रकारच्या मूर्ती किल्ल्यावर ठेवण्यासाठी यंदा प्लास्टिक पेक्षा मातीच्या मूर्तीना मागणी आहे. बाजारात छत्रपती शिवाजी महाराज ,सैनिक , व मावळ्यांच्या विविध आकाराच्या व मुद्रांच्या आणि रंगांच्या मुर्त्या उपलब्ध आहेत. याबरोबरच मातीच्या तोफा शिवाय , प्राणी (हत्ती, वाघ, बैल इत्यादी) सुद्धा मिळत आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज, मावळे व इतर मूर्तीच्या किंमतीत यंदा वाढ झालेली नाही. मात्र विक्री वाढली आहे. अनेकजण चांगला प्रतिसाद देत आहेत अशी माहिती मुळेखंड ,कुंभार आळी येथील . अश्विनी अशोक मांडेलकर व नर्मदा विष्णू मांडेलकर यांनी सांगितले
दिवाळीत मातीचा किल्ला बनविणे त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मातीचे मावळे विराजमान झालेले खूप आवडतात. मागील वर्षी कोरोना जास्त पसरत असल्याने मित्रांसोबत किल्ला बनविता आला नाही. मात्र यंदा किल्ला बनविणार आहे. किल्ला बनवितांना मजा येते.
असे दिनेश म्हात्रे यांनी सांगितले
मागील वर्षी कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला होता. मूल्यांची विक्री निम्म्यापेक्षा अधिकने घटली होती. खूप नुकसान झाले. यंदा मात्र विक्री चांगल्या प्रकारे पणत्या ,मावळे , महाराज, मावळे व इतर मूर्तीच्या किंमतीत यंदा वाढ झालेली नाही. मात्र विक्री वाढली आहे. अनेकजण चांगला प्रतिसाद देत आहेत. पारंपारिक मातीच्या पणत्या ,५० रुपये,४० रुपये डझन ,३० रुपये डझन या दराने आम्ही विकतो मुलेखंड येथील नर्मदा विष्णू मांडेलकर यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *