जालना ( प्रतिनिधी) : मुंबई सह परिसरात कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि घाटांमध्ये होत असलेले भूस्खलन यामुळे रेल्वे पटऱ्यांवर पाणी साचत असल्याने दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी रेल्वे ऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करत गैरसोय टाळावी . अशी माहिती जालना रेल्वे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान यांनी आज दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना सुभाषचंद्र देवीदान म्हणाले, आपण दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाशी रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकां बाबत संपर्क साधला असता गत चार दिवसांपासून मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून कल्याण, इगतपुरी ,कसारा घाटांमध्ये अतिपावसामूळे भूस्खलन होत आहे. काही ठिकाणी पटऱ्यांवर पाणी साचल्याने रेल्वे पटरी चा काही भाग वाहून गेला . या पार्श्वभूमीवर नांदेड विभागाने काही दिवसांसाठी पुढील गाड्या रद्द केल्या आहेत अशी माहिती देण्यात आली. यात ( गाडी क्रं ०११४१ ) मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम विशेष एक्सप्रेस दि. २४ ते २७ जुलै दरम्यान पुर्णतः रद्द राहील. ( गाडी क्रं. ०११४२) आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम विशेष एक्सप्रेस दि. २५ ते २८ जुलै पर्यंत पुर्णतः रद्द, ( गाडी क्रं ०७६११) नांदेड – मुंबई राज्य राणी विशेष एक्सप्रेस दि. २४ ते २७ पर्यंत रद्द, ( गाडी क्रं ०७६१२) मुंबई- नांदेड राज्य राणी विशेष एक्सप्रेस दि. २५ ते २८ जुलै पर्यंत ,( गाडी क्रं ०७६१३) पनवेल- नांदेड विशेष एक्सप्रेस दि. २५ ते २८ जुलै पर्यंत रद्द, ( गाडी क्रं. ०७६१४) नांदेड- पनवेल विशेष एक्सप्रेस दि. २४ ते २७ जुलै पर्यंत रद्द, ( गाडी क्रं. ०७६१७) नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस दि. २४ ते २७ जुलै पर्यंत तसेच ( गाडी क्रं ०७६१८) मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस दि. २५ ते २८ जुलै पर्यंत पुर्णतः रद्द करण्यात आली आहे.
तरी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे ऐवजी पर्यायी पर्यायी वाहनांद्वारे प्रवास करत आपली गैरसोय टाळावी .असे आवाहन सुभाष चंद्र देवीदान यांच्या सह रेल्वे संघर्ष समिती च्या वतीने करण्यात केले आहे.
Leave a Reply