ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माणदेशी मातीच्या स्पर्शाने आयुष्यात परिवर्तन- महेंद्र अवघडे

May 8, 202221:37 PM 41 0 0

सातारा हिरकणी : माण देशाची माती ही कर्तृत्ववान व्यक्तींच्या गुणांची कदर करणारी आहे या मातीचा स्पर्श ज्यांच्या पायांना झाला त्या व्यक्तीच्या आयुष्यात परिवर्तन आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही “असे प्रतिपादन सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन व शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी केले. अष्टभुजा हिरकणी च्या कार्यकारी संपादक विदया निकाळजे यांना राज्यस्तरीय हिरकणी सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी श्री अवघडे बोलत होते.महिला आघाडी अध्यक्षा वर्षा देवकर,शिक्षक विभागीय अध्यक्ष मोहन जाधव प्रमुख पाहुणे होते.
श् अवघडे पुढे म्हणाले, आपल्या भागातील एक होतकरू पत्रकार व संघटक विदया निकाळजे यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य व धडपड वाखाणण्याजोगी आहे त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पोहोच पावती आहे.प्राथमिक शिक्षक संघ हा अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा नेहमीच सत्कार करीत आला आहे.विदयाताई निकाळजे यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शिक्षक बँक नक्कीच मदत करील असे आश्वासन श्री अवघडे यांनी दिले. यावेळी इंग्रजीतून आपल्या वडिलांचे चरित्र लिहिणारे शिक्षक हरीश गोरे, शिक्षक संघाचे सरचिटणीस सूरज तुपे,दत्तात्रय वाघमारे,अजिनाथ गलांडे,वर्षा देवकर यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी विदया निकाळजे यांनी प्रत्येक यशस्वी स्त्री च्या पाठीमागेसुद्धा एक पुरुष असतो असे सांगून आपल्या यशामध्ये सहकार्य करणाऱ्या व्यक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय वाघमारे यांनी केले आभार दत्तात्रय कोळी यांनी मानले.
यावेळी शिक्षक संघाचे अप्पा भुजबळ, दत्तात्रय गलांडे तसेच इतर बहुसंख्य शिक्षक ,प्राथमिक शिक्षक बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *