ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा कोषागार कार्यलयातर्फे वनमहोत्सव 2021-22 अंतर्गत वृक्षारोपन संपन्न

August 7, 202114:07 PM 18 0 0

जालना  – दि. 6 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, जालना तर्फे जिल्हाधिकारी जालना डॉ. विजय राठोड यांचे हस्ते ओमनगर जालना येथे वनमहोत्सव 2021-22अंतर्गत वृक्षारोपन सोहळा पार पडला. वृक्षारोपन सोहळा कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी जालना यांनी वृक्षारोपनासह वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाअंती सर्व उपस्थित मान्यवरांचे जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, यांनी आभार व्यक्त केले. या वृक्षारोपन सोहळ्यास अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, मुख्याधिकारी श्री. नार्वेकर, वनअधिकारी अधिक्षकश्री. जाधव राज्य उत्पादन शुल्क श्रीमती जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसैये इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम मारोडे यांनी या कार्यक्रमास जालना कोषागार कार्यालयातील अपर कोषागार दिपक जयवळ, उमेश कुलकर्णी, मोहम्मद सोईफ उपकोषागार अधिकारी, उपलेखापाल किशोर चिखलीकर, उपलेखापाल सुरेश बोरोले तसेच कोषागार कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *