जालना ( प्रतिनिधी) : ग्लोबल वार्मिंग च्या दुष्परिणाम मुळे मानवजात नष्ट करणारे महाभयंकर रोग निर्माण होत असून प्राणवायूची कमतरता भासत आहे. धरतीवरील प्राणिमात्र, वन्यजीव वाचवायचे असतील तर वृक्ष लागवडीसह संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष रो. महेंद्र बागडी यांनी आज येथे बोलतांना केले. रोटरी क्लब ऑफ जालना आणि बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने राजूर रोड वरील बुलढाणा अर्बन वेअर हाऊसच्या परिसरात रविवारी ( ता.०१) वृक्ष लागवड करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात बागडी बोलत होते. बुलढाणा अर्बन चे संचालक अंबेश बियाणी, लक्ष्मीनारायण मानधना, दिनेश लोहिया ,मनोज झंवर, गोपाल लोहिया ,किरण खरात ,रोटरीचे सचिव रो. अरुण मोहता, प्रकल्प प्रमुख रो. सुरेश मगरे, रो. सुरेश अग्रवाल,रो.रामकिशन बगडिया, रो.हेमंत ठक्कर , रो.शिवपाल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
रो महेंद्र बागडी यांनी धर्मशास्त्रात वृक्षांचे महत्त्व विषद केले असून भारतात आदिम काळापासून तुळस, पिंपळ ,वड या प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचे महत्त्व ओळखून श्रद्धेप्रमाणे त्यांची पूजा केली जाते. यामागे वैज्ञानिक दृष्टीकोन प्राचीन काळापासून होता असे नमूद केले. बुलढाणा अर्बन ने वृक्षांचे जतन करावे. असे आवाहन ही रो.महेंद्र बागडी यांनी शेवटी केले.
अंबेश बियाणी यांनी रोटरी परिवारासोबत बुलढाणा अर्बन पर्यावरण पूरक तसेच सामाजिक उपक्रम करण्यास तत्पर असून निवासी कर्मचारी वृक्षांचे जतन करतील असे सांगितले.
प्रकल्प प्रमुख रो. सुरेश मगरे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिव रो.अरुण मोहता यांनी आभार मानले. यावेळी राजेश सोनी, संदीप मुंदडा, किशोर देशपांडे, डॉ अमित काबरा, डॉ.विजय जेथलिया, रवी झंवर, जगदीश राठी, अरुण अग्रवाल, गोपाल मानधनी, मनोज झंवर, दीपेश भारवाडा यांच्यासह रोटरीचे सदस्य व बुलढाणा अर्बन चे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply