ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण नगरपरिषद वतीने वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

October 3, 202112:58 PM 40 0 0

उरण (संगिता पवार ) उरण नगरपरिषद वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शनिवार ( दि. २ ) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उरण -बोरी येथील रहाळकर मैदान येथे वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .व स्वच्छ सर्वेक्षेण २.०२२ अंतर्गत ५० सफाई कामगारंना सफाई सन्मान देऊन सन्मानित केले एका रोपाची लागवड करून त्याचे एका वृक्षात रुपांतर करून जगाला एक सुंदर वृक्ष भेट देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार नागरिकांनी घ्यावा व जगाला निरंतर ऑक्सिजन चा पुरवठा करणारा स्तोत्र उपलब्ध करून घ्यावा हा उद्देश उरण नगरपरिषदेचा आहे .


सदर कार्यक्रम कोरोना प्रतिबंध चे सर्व नियमपाळून करण्यात आले . या कार्यक्रमासाठी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,,उपनगराध्यक्षजयविन कोळी ,उरण तालुका भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,मुख्याधिकारी संतोष माळी ,आरोग्य सभापती यास्मिन गॅस , सर्व नगरसेविका ,नगरसेवक मेराज शेख .,नगरसेविका जानव्ही पंडीत ,नगरसेविका स्नेहल कासारे , आरोग्य निरीक्षक हरेश तेजी ,,डॉ. विकास मोरे ,डॉ. सत्या ठाकरे , डॉ. सुरेश पाटील ,हितेश शहा ,हस्तीमल मेहता , ग्राइंडवेल नॉर्टन कंपनीचे मॅनेजर अॅडमिन चे सिनिअर मॅनेजर आय .बी ,सिंग ,गणपत दाटेकर , अजित भिंडे ,पी .एन .सिंग ., गिरीश परीहारीया, प्रसाद मांडेलकर नगरपरिषद चे कर्मचारी,नॉलेज ऑफ फौंडेशन चे सर्व सदस्य ,नेहरू युवा केंद्र सदस्य आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *