ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात व्हावे वृक्षारोपण

September 12, 202112:58 PM 53 0 0

वाढते प्रदुषण पहाता पशुपक्षी,प्राणी,जीव-जंतु यांचे जगने कठीण झाले आहे.त्यामुळे आता प्रत्येक सण-उत्सव हे पर्यावरण पूरक असायला हवे. श्री गणेश यांच्या जवळ ज्ञानाचा भंडार व बुद्धी सागर आहे.याचा आपण अचूक फायदा घेऊन निसर्गाचा होत असलेला ह्रास थांबवीला पाहिजे.गणेशोउत्सवाच्या निमित्ताने निसर्गाचे संगोपन करण्याचा संकल्प सर्वांनीच करावा. श्री गणेश हे प्रत्येक गोष्टीच्या प्रथम स्थानी विराजमान असतात आणि आहे.त्यामुळेच ते प्रत्येकाच्या मनात, हृदयात वावरत असतात.अशा परिस्थितीत निसर्गाचा होत असलेला ह्रास थांबविण्याची शपथ गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी घ्यायला हवी.कारण आपण पहाले की कोव्हीड-19 ने करोना व्हायरस 2020 पासून आतापर्यंत सुरूच आहे.या व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले.यात भारतात सुध्दा मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली. याची झळ संपूर्ण महाराष्ट्रासह भारताला सोसावी लागली.यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा पडला होता ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.श्री गणेश हे शांतीचे प्रतीक आहे.कोणत्याही गोष्टींची सुरूवात करायची असेल किंवा पुजा-अर्चना करायची असेल तर सर्वप्रथम श्रीगणेशाची आराधना केली जाते व पुजेला सुरूवात होते.गणेश उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकांनी एक तरी झाड लावुन त्याची पुजा-अर्चना केली पाहिजे.यामुळे झाडांचे संगोपन होईल.

ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांनी एखाद्या कुंडीमध्ये झाड लावुन निसर्ग वाचविला पाहिजे.यामुळे हजारो झाडांचे वृक्षारोपण होईल व जोपासना सुध्दा होईल.यामुळे निसर्ग प्रफुल्लीत होईल व आपल्याला खुल्या मनाने बागडता येईल.श्री गणेशांना हेच पाहिजे असते की मानव जाती, पशुपक्षी,जीव-जंतु,सुखी-आनंदी व समाधानी रहावे.याकरीता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण या पृथ्वीतलावर मानवच हा बुध्दीजीवी प्राणी आहे.परंतु मानवाने आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी बुद्धीचा दुरूपयोग केला ही बाब जगजाहीर आहे.देव-दानव,राक्षस यांनीही त्याकाळीसुध्दा निसर्गाचे जतन केले होते.परंतु बुध्दीजीवी मानवाने गेल्या काही वर्षांत निसर्गाची राखरांगोळी करुन ह्रास केला व पृथ्वीला भयभीत केले आहे.परंतू बुध्दीवंत व देवाधीदेव श्रीगणेश यांच्या उत्सवानिमित्त आपण सर्वांनी निसर्गाची जपणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन वृक्ष लागवड केली पाहिजे व वृक्ष तोड थांबवली पाहिजे.लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना जनजागृतीसाठी केली होती.परंतु आता निसर्गाला वाचवीण्याकरीता वृक्षलागवड करून मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायला हवी.कारण ही काळाची गरज आहे.आपण पुजा-अर्चना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांचा व पाणांचा वापर करतो.यामुळे प्रसंन्नता निर्माण होते.अशा परीस्थितीत फुलांच्या झाडांचेही वृक्षारोपण आपण करू शकता.गणेशाचे आगमन हे शुभ संकेतांचे प्रतीक आहे.वृक्ष लागवडीच्या शुभ कार्याला वेळ न करता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी.जंगलामध्ये रहाणारे अनेक वन्य प्राणी हे सर्व देवांचे रूप असतात.हत्तीसुध्दा श्री गणेशाचाच अवतार आहे त्यामुळे हत्तीला गजराज म्हणुन संबोधल्या जाते.श्री गणेश बुध्दीचे आणि विद्येचे प्रतीक आहे.त्यामुळे नागरिकांनी आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून निसर्गाला वाचवीण्याकरीता आजच श्रीगणेश: करायला हवा.श्री गणेशाला प्रार्थणा करून गणेशोत्सवाच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा श्री गणेश: व्हायला पाहिजे.कारण निसर्ग सृष्टी रहाली तर आपण राहु आपण रहालो तर देश राहिल.चला तर मग आपण वृक्षलागवडीचा संकल्प करूया.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मंडळ आहेत.त्या सर्व मंडळींनी वृक्षलागवडीवर भर दिला पाहिजे.कारण यामुळे निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यास मदत होईल.देशात गणेशोत्सवा प्रमाणेच पुढे दुर्गाउत्सव देशभरात साजरा केल्या जाईल या निमित्ताने सुध्दा स्वच्छत: व वृक्षलागवडीचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात व्हायला हवा.याचा फायदा सर्वांच्यात आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर राहील.ही संपूर्ण सृष्टी म्हणजे देवाचीच देन आहे.आकाश-पाताळ,पुर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण,सुर्य-चंद्र , नदी-समुद्र हे संपूर्ण देवांनी आपल्याला उपभोगासाठी दीले.परंतु मानवजातीने या संपूर्ण समुहाचा दुरूपयोग केला आहे त्यामुळे आज पृथ्वी डगमगतांना दिसते.त्यामुळे गणेशोत्सवाचे औचित्य साधून वृक्षारोपणावर मोठ्या प्रमाणात करून निसर्ग वाचवीण्याचा संकल्प केला पाहिजे.संपुर्ण गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779, नागपूर.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *