ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नगराजशेठ यांच्या शोकसभेत अनेक मान्यवरांची श्रद्धांजली: आठवणींना उजाळा

January 8, 202216:01 PM 42 0 0

उरण (संगीता पवार ) : उरण नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष, उनपचे माजी सदस्य , समाजसेवक, दानशूर व्यक्तीमत्व दिवंगत नगराज शेठ यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी (७) उरण शहरातील तेरापंथी सभागृहात नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल बोरी -उरणचे अध्यक्ष नरसु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत उपस्थित अनेक मान्यवरांनी त्यांचे सामाजिक कार्य आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

याप्रसंगी माजी आमदार शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,नरसु पाटील, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू, कामगार नेते भुषण पाटील, सुरेश पोस्ततांडेल,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी राजिप सदस्य जनार्दन भोईर, उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती महादेव बंडा, शेकाप महिला आघाडी प्रमुख सीमा घरत,माजी नगरसेवक चिंतामण गायकवाड,झैदमुल्ला,रविंद्र घरत, महेंद्र कांबळे नगरसेविका वर्षा भोईर, गौरी देशपांडे, प्रदीप पाटील, डॉ. शिप्पी, ज्येष्ठ पत्रकार श्याम कुलकर्णी आदी मान्यवरांसह शेकडो नगराजशेठ यांचे चाहते या शोकसभेत सहभागी झाले होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *