ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांना आदरांजली

September 20, 202112:42 PM 48 0 0

उरण प्रतिनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) :  अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्ष कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी फुंडे येथील एस. एस.पाटील इंटरनॅशनल विद्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी रायगड जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या व विविध पक्षाचे नेते उपस्थित होते.


कॉम्रेड ज्योती जगन्नाथ म्हात्रे यांचे 12 सप्टेंबरला आकस्मित निधन झाले. त्यांना आदरंजी वाहतांना अनेकांनी कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला. 25 वर्षांपूर्वी पती आणि मुलगा गमावल्या नंतरही खचून न जाता महिलांवरील अत्याचारा विरोध त्या आयुष्यात अखेरच्या श्वासा पर्यंत कार्यरत होत्या. आपल्या कार्यातून त्यांनी शेकडो महिलांची संसारे उभी केली. अनेक निराधार महिलांना आधार दिला,कामगार,शेतकरी,दलित,प्रकल्पग्रस्तांच्या, आदिवासींच्या हक्कासाठी असलेल्या प्रत्येक लढ्यात त्यांनी हिरहिरीने भाग घेतला. जिल्ह्यातील आपत्तीच्या वेळी मदतीचा हात दिला. त्या एक उत्तम फॅशन डिझायनर होत्या. त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. अशा या अष्टपैलू कॉम्रेडला समाजाने गमावले असल्याची भावना यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. शोक सभेच्या अध्यक्षस्थानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड संजय ठाकूर हे होते. यावेळी जेएनपीटीचे कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,अलिबाग नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे,जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील,कॉम्रेड नयन म्हात्रे,जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील,जिल्हा सचिव अमिता ठाकूर,उरणच्या माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर,माजी नगरसेविका अफशा मुकरी,शेकापच्या महिला नेत्या सीमा घरत,जनवादीच्या प्रमिला म्हात्रे,चंपा पाटील,कुसुम ठाकूर,सुनंदा वाघमारे,राजश्री म्हात्रे,किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,डी. वाय. एफ.आय. युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संतोष ठाकूर,दादरपाडा येथील वसंत मोहिते तसेच कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांचे जावई मनोज कडू व नाती नुपूर आणि मैथिली या दोघींनी ही आपल्या आजीच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. यावेळी कॉम्रेड ज्योती म्हात्रे यांचं महिलांना न्याय देण्याचं कार्य पुढं नेण्याचा निर्धार करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *