पिवळा निळा हिरवा
भगवा लाल पारवा
जाती धर्मा नुसार रे
रंग आपला ठरवा
रंगात लागते भांडण
आहे कुणाला पर्वा
जिंकेल तो आपला
झेंडा खुशीत मिरवा
रंगांची होई साठमारी
आपसात त्या लढवा
इंग्रजाचीछान देणगी
एक दुस-यां भिडवा
काळा रंग अंतरंगात
नसा नसात साठवा
पांढरारंग हा तहाचा
सर्वात शेवटी पाठवा
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
Leave a Reply