ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओएलक्सवरुन ऑनलाईन गंडा घालणारे त्रिकुट जेरबंद; सात दुचाकी वाहनांची चोरी करणारे दोन चोरटेही अटकेत

December 14, 202120:50 PM 38 0 0

उरण ( संगिता पवार ) : ओएलक्स ऑनलाईन ॲपवरून वाहनांच्या विक्री व्यवहारात ग्राहकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात आली असल्याची आणि घरफोड्या आणि दोन लाखांच्या सात दुचाकी वाहनांची चोरी दोन चोरटे ही अटकेत: उरण पोलिसांची कामगिरी : पोलिस उपायुक्त परिमंडळ २ शिवराज पाटील यांनी पत्रका परिषद मंगळवार ( दि. १४ ) वाणी आळी ,उरण यथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहितीदिली सदरचे प्रकरण उरण पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास करीत उघडकीस आणली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी (१४) पत्रकार परिषदेत दिली.

उरण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिताफीने तपास करत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.यापैकी ओएलक्स ऑनलाईन ॲपवरून वाहनांच्या विक्री व्यवहारात ग्राहकांची फसवणूककरणारी नागपूर येथील तीन आरोपींना अटक केली आहे.मयुर धानोरकर,सनी चोपडे,मनीष बालपांडे हे त्रिकूट इंटरनेटवरून वाहनांचे फोटो घ्यायचे.वाहनांचे हे फोटो इंटरनेटवरून ओएलक्स ॲपवर अपलोड करायचे.या अपलोड केलेल्या वाहनांची कमी किंमत दाखवून ग्राहकांना आकर्षित करायचे.आकर्षित झालेल्या ग्राहकांकडून विक्री करण्याच्या वाहनांसाठी आगाऊ रक्कम मागवायचे.पैसै मिळताच फोन बंद करायचे.अशा पध्दतीने फसवणूक झाल्याच्या तक्रारी नंतर वपोनि सचिन पाटील यांनी नागपूर येथुन त्रिकुटाला अटक करुन ओएलक्स ऑनलाईन ॲपवरून वाहनांच्या विक्री व्यवहारात ग्राहकांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. तर दुसऱ्या प्रकरणात उरण पोलिस हद्दीत घरफोडी करणारे आणि दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या करण मगरे (१९ ),अक्षय निवळकर (२४) या दोन संशयित आरोपींना उरण पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून सुमारे २ लाख एक हजार ५० रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.याप्रकरणी आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताहीपोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी (१४) पत्रकार परिषदेतून दिली.तसेच इतर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाचीही माहिती देण्यात आली. उरण येथील तेरापंथी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त परिमंडळ २ शिवराज पाटील , न्हावा -शेवा बंदर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सचिन सावंत,उरण वपोनि सुनील पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे ) सुहास चव्हाण ,सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार , सपोनि महेश माने आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *