ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सहल..अविस्मरणीय सुवर्ण क्षण

October 1, 202114:22 PM 17 0 0

प्रवास हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आपल्या दैनंदिन व्यस्त जीवनशैलीतून थोडासा बदल म्हणून प्रवास ही दृष्टी आता विकसित होत आहे तसे तर पूर्वीपासून प्रवासाची पद्धत आहेत फक्त पूर्वी निमित्त असायचे देवदर्शन तर आता त्याची जागा थोडासा चेंज या बाबी ने घेतली आहे . प्रवासाने दैनंदिन कामकाजाचा संपूर्ण थकवा पळून जातो व नैसर्गिक आनंदाची प्राप्ती होते. कोणत्याही प्रवासातून आनंदच मिळतो परंतु कुटुंबासोबत प्रवास करताना घरातील स्त्रीला मुलांचे व पतीचे कपडे, खाण्याचे पदार्थ, आवश्यक औषधी इत्यादी सर्व गोष्टींकडे लक्ष देणे अपरिहार्य ठरते पण हाच प्रवास जर मैत्रिणींसोबत असेल तर मग काय! हास्याचे कारंजे ,गप्पा, सुख-दुःख शेअर करणे इत्यादी गोष्टीमध्ये स्वतःवरील जबाबदाऱ्या थोड्या कालावधीसाठी का असेना पण आपले वय व जबाबदार्या दूर सारून मैत्रिणींसोबत निसर्गातील मनसोक्त आनंद घेणे ,एक स्वप्नच वाटते ना?


…. म्हणतात ना तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खात असतात. पण तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात…. सर्वांना हवी ती गोष्ट भेटते फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा. अशीच एकदा वेळ माझ्या आयुष्यात आली . अचानकच मला माझ्या प्रिय मैत्रीणीं सोबत प्रवास करण्याचा योग आला तसं तर आला काय तो आम्ही मुद्दामच जुळवून आणला मग काय नुसती धमाल कोणता ड्रेसींगपासून आमचे नियोजन सुरू झाले,
प्रवासाचे कोणते ठिकाण तर माझे खूप आवडते ठिकाण ते म्हणजे महाबळेश्वर जालन्या वरून आम्ही सकाळी निघालो संध्याकाळी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो मुक्कामाची व्यवस्था ऑनलाइन केलेली होती त्याप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन फ्रेश झालो आणि जेवणासाठी बाहेर पडलो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही तिथे गेलो होतो नोव्हेंबर ची कडाक्याची थंडी आणि कुडकुडणाऱ्या थंडीत आम्ही मनसोक्त आईस्क्रीम खाल्लं पोटभर जेवलो. रात्रभर संगीत रजनी ,गप्पा,नुसती धम्माल सकाळ कधी झाली ते कळलेच नाही. लगेच फ्रेश होऊन दुसऱ्या दिवशी फिरायला तयार महाबळेश्वरचा प्रेक्षणीय परिसरच एवढा मोठा की त्यासाठी दोन दिवस आम्हाला फिरायला लागणार होते सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या व पुण्यापासून 120 किमी अंतर असलेल्या शहरातील पाच नद्यांचे उगम स्थान पाहण्याचे ठरवले .काही नद्यांचे उगमस्थान प्रत्यक्ष तर काही नद्यांचे उगमस्थान दुर्बिणीद्वारे पाहिले. त्यामध्ये वेण्णा लेक मधील प्रसंग अवर्णनीय आहे. वेन्ना लेक मध्ये बोटिंग नंतर तिथे असलेल्या ग्राउंडवर आम्ही घोडेस्वारी चा बेत केला कधीही कशाला न घाबरणार्याआम्ही घोडेस्वारी करताना मात्र एकदमच लटपटून गेलो आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात आणि नजरे समोर तोच प्रसंग उभा राहतो.घाबरत घाबरत, वेडीवाकडी तोंड करत आम्ही घोडेस्वारी पूर्ण केलेली अजुनही तो प्रसंग जसाच्या तसा जिवंत आठवतो .अशीच दोन दिवस धमाल करून एक नवीन उर्जा घेऊन आमच्या प्रिय कुटूंबात आणि दैनंदिन कामकाजात उत्साहाने परतलो.
खरंच आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास करून निसर्गाला अनुभवण्यात आहे हा एक नवीन साक्षात्कार मला या सहलीतून झाला .

शब्दांकन,
डॉ शिवनंदा उमाजीराव मेहेत्रे,
जि. प.प्रशाला मुलांची,जालना
9421657614.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *