ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सत्याला पैशामुळे मरण आहे !

December 6, 202016:57 PM 159 0 0

सत्याला मरण आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण सत्य रोजच्या रोज मरत असतं. कधी लाचार बनून तर कधी बदनाम होवून. कारण आज स्वार्थीपणा जास्त वाढलेला अाहे. स्वार्थीपण व पैसा कमविण्याचा हव्यास यामुळं सत्य मरत चाललेलं असून त्याला वाचवतो म्हटलं तर आपलंच मरण होत असतं.म्हणून सत्याला वाचवायला कोणीही पुढं येत नाही.

घर असो की न्यायालय, शाळा असो की कार्यालय सर्वच ठिकाणी काही ना काही खोटं बोलणं असतंच. न्यायालयात तर हमखास खोटं बोललं जातं. कारण त्याशिवाय न्यायालयात पक्षकारांना न्याय मिळवून देता येत नाही. मग या खोटे बोलून खटल्याची बाजू मांडण्यात जो आरोपी असतो, तो जिंकूनही जातो. तसेच ज्याची बाजू खरी असते, तो हारुनही जातो. अशाचवेळी ज्यांची बाजू खरी असल्यास आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागल्यास तो केव्हा जीव सोडेल हे सांगता येत नाही. अर्थात तो केव्हा आत्महत्या करेल हे काही सांगता येत नाही.
एक उदाहरण देतो.एका व्यक्तीला काहीतरी आरोप लावून मारहाण केली. त्यात जबर दुखापत तर झाली,अपमानही झाला. तो आपल्या मारहानीवर व अपमानावर दाद मागण्यासाठी न्यायालयात गेला. नव्हे तर न्यायालयात वकीलामार्फत दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण ज्याप्रमाणे पक्षकारानं वकील आपली बाजू मांडायली उभा केला. त्याचप्रमाणे प्रतीपक्षकारानेही आपली बाजू मांडायला वकील उभा केला. साक्षपुरावे तपासण्यात आले आणि तो खटला खारीज झाला.पक्षकाराचा झालेला अपमान व मारहाण धुळीस मिळाली. सत्य टिकलं नाही. कारण बरोबर तपास झाला नाही. पिरतिपक्षकारानं निव्वळ पैशाच्या भरवशावर सत्याला मारलं. साक्षीदार विकल्या गेले. पोलिस विकल्या गेले. वकील विकल्या गेला.न्यायाधीशही.सत्य पैशासमोर मरण पावलं. त्यानंतर काही महिण्यातच प्रतिपक्षकारानं पक्षकारावर खटला भरला. खटल्यात बाजू मांडली की जो पुर्वी पक्षकार होता, त्यानं त्याला बदनाम करण्यासाठी खटला टाकला होता. आता त्या झालेल्या अपमानाचा मुहावजा म्हणून त्याने काही पैसा द्यावा.
कसा लढायचा खटला? ज्याच्याजवळ पैसा अतोनात, त्याचं ठीक आहे. पण ज्याच्याजवळ पैसा नाही. त्याच्यावर अत्याचार झाल्यास त्यानं कोणाकडं दाद मागावी? सत्याला जर असं पैशाच्या शस्रानं मारलं जात असेल तर.
काल मनुस्मृतीच्या माध्यमातून स्पृश्य मंडळी अस्पृश्य आणि स्रीयावर अत्याचार करीत होती.

आज मात्र न्यायालयाच्या माध्यमातून श्रीमंत आणि असत्य बोलणारी मंडळी गरीबावर व स्रीयांवर अत्याचार करीत आहेत. कितीतरी स्रीयांवर आज बलत्कार होतांना दिसत आहेत. त्यांना न्यायालयाच्या माध्यमातून बरोबर शिक्षा मिळत नसल्याने. जर बलत्कार करणा-या लिंगपिसाटांची लिंगच कापून टाकण्याचे आदेश न्यायालयाने प्रत्येक बलत्कारपिडीतांच्या न्यायाच्या वेळी दिला असता तर आज बलत्कार करणा-यांच्या संख्येत वाढ झाली नसती. पण न्याय करतांना वकील म्हणतात की ही सुई मी फिरवीत आहे. ह्यात धागा कसा जाईल? बलत्कार होतांना पिडीता चूप बसली नसेल. मग बलत्कार झालाच कसा? सत्य इथंच हारत असते.पैशाची थैली दिली जाते आधीच वकिलांना, न्यायाधीशही विकत घेतले जातात रात्रीच्या अंधारात. इथे जो गुन्हेगार असतो……..श्रीमंत गुन्हेगार, त्यांच्यासाठी रात्रीला न्यायालय खुलतं. तसेच बलत्कार पिडीतेच्या खटल्यात आरोपींना फाशी देतांना दहा वेळा तारखा दिल्या जातात. न्याय असंगत तर नाही असं तपासून पाहतांना. सर्व सिद्ध होवूनही. आरोपींना पुर्ण स्वतंत्र्य आणि जर अशा केसेस बलत्कार पिडीता हारल्यास आमची बदनामी केली म्हणून उलटा चोर कोतवाल को दाटे अंतर्गत पुन्हा पिडीतेंवरच केस दायर होते. आधीच पैशानं आणि बदनामीनं मेलेली पिडीता. मग अशी केस दायर झाल्यास तिनं काय करावं?
बलत्कार पिडीता अरुणा शानबाग. बावीसव्या वर्षी बलत्कार झाल्यानंतर कोमात गेली. आरोपी पकडला गेला, त्यानं शिक्षा भोगली. त्यानंतर सुटका झाली. त्याचं लग्नही झालं. दोन मुलंही झाली. तरीही ती कोमातच. शेवटी कोमातच मृत्यूही झाला.अजूनही तो जीवंत आहे. इथेही सत्य हारलं आणि असत्य जीवंत राहिलं.

शेतीत काम करणारा शेतकरी सत्याचं प्रतिक आहे. त्याला जो भाव दिला जातो.तो घेतो व गुपचूप बसतो. नियतीही त्याच्या सत्यावर विश्वास करीत नाही. तर कधी जास्त दुष्काळ तर कधी कमी. कधी ओला तर कधी सुका.मात्र भाव करणारा तो दलाल, खोटं नाटं बोलून मालाचा भाव करतो. कमी पैशात अंटवतो आणि जास्त पैशात विकतो आणि खोटं बोलूनच जास्त पैसा मिळवतो. अन् मेहनत करणारा कास्तकार मागंच राहतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे सत्याला पैशापुढं मरण असलं तरी सत्य कधीच मरत नाही. हं पराजीत नक्कीच होते. ते कधी ना कधी बाहेर येतेच आपलं मुंडकं काढत.तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.

 

अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *