जालना (प्रतिनिधी) केंद्र सरकारने लागू केलेले जाचक कृषी कायदे रद्द करण्यासाठी मंगळवारी 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला आ.कैलास गोरंटयाल यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात आ.गोरंटयाल यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकर्यांसाठी अत्यंत जाचक ठरू लागले आहेत.
शेतकर्यांसाठी मारक आणि भांडवलदारांच्या हिताचे कृषी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.तरीही भांडवलदारांचे हित जोपासनार्या केंद्र सरकारला जाग येत नसल्याने उद्या दि.8 डिसेंबर मंगळवार रोजी जाचक कृषी कायदे रद्द करण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी देशव्यापी बंद पुकारला आहे.या बंदला आपला पूर्णपणे पाठिंबा असून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. जालना शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी,व्यावसायिकानी या बंदमध्ये सहभागी होऊन देशव्यापी बंद यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी आ.गोरंटयाल यांनी केले आहे.
Leave a Reply