जुना कदीम पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी जप्त केलेले व विविध गुन्ह्यात पकडून आणलेल्या गाड्यांना आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.4 गुरूवार रोजी दुपारी 3 वाजता जुना कदिम पोलीस स्टेशन येथील ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केल्या होत्या त्याच्या बाजूला एक कचराकुंडी होती त्या कचरा कुंडीला आग लागली होती परंतु अद्याप कशा मुळे आग लागली हे कळू शकले नाही. प्रथम दर्शनी असे लक्षात येते की कचरा कुंडीचा बाजूलाच लागलेल्या आगीमुळे पहिली गाडीने पेट घेऊन बाकीच्या गाड्यांनी पेट घेतला. असा प्राथमिक अंदाज दर्शवला जात आहे,
एकूण बारा गाड्या त्या आगीत जळून भस्म झाल्या
त्याच्याच बाजूला नव्याने जिल्हा वाहतूक शाखा कार्यरत असल्यामुळे तेथील वाहतूक शाखेचे कर्मचारी व कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ लामगे, अनिल जीने, व फायर कर्मचारी संजय हिरे व सादिक अली, कामल सिंग राजपूत ईतर कर्मचाऱ्यांनी स्वतः आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान फायर ब्रिगेडला फोन केल्या नंतर अवघ्या काही मिनिटातच फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे साधारण दहा-बारा गाड्या आगीपासून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना यश आले. या आगीमध्ये छोटा हत्ती – (02),सफारी – (01),इंडिगो – (02),ओमिनी – (02 – 03) अशा चार चाकी गाड्या जळून खाक झाल्याचे वृत्त आहे
Leave a Reply