जालना/प्रतिनीधी :राजूर रोडवरील भाडेतत्वावर घेतलेल्या खताच्या गोडाऊनमध्ये चोरी झाल्याची तक्रार सोमवारी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चंदनझिरा पोलीसांनी अवघ्या काही तासातच दोघा जणांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातुन 4 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी पथकास सूचना दिल्या होत्या़ पथकातील कर्मचारी अनिल काळे यांना तपास करीत असतांना ही चोरी घाणेवाडी येथील रेकॉर्डवरील आरोपी शिवाजी पवार रा़ घाणेवाडी याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली़ यावरून चंदनझिरा पोलीसांनी त्यास घाणेवाडी येथील तलावाजवळुन शिताफीने ताब्यात घेतले़ अधिक विचारपुस केली असता त्याने त्याच्या साथीदार गणेश धर्मनाथ चव्हाण रा़ घाणेवाडी याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली़ पोलीसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून चोरी केलेल्या 33 गोण्या व गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिकअप वाहन (क्र. एमएच 21 क्युजी 0651) असे 4 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस अंमलदार रामकिसन वाघमारे, पोलीस कर्मचारी अनिल काळे, साई पवार इतर महिला अंमलदार श्रध्दा गायकवाड यांनी केली आहे.
Leave a Reply