जालना | हिरकणी टीम
अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लांबवणार्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोंदी पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते.
काल औरंगाबाद विभागाचे आयजी मालिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा अवघ्या 24 तासात छडा लावल्यामुळे जालना पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply