ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान उरणच्या ओएनजीसी पीरवाडी हेलिपॅड जवळ पिस्टलसह दोन इसमांना अटक

December 14, 202120:35 PM 31 0 0

उरण ( सांगीत पवार ) :  उरण पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ओएनजीसी – पीरवाडी हेलिपॅड जवळ एका जीपमधून भारतीय बनावटीच्या पिस्टल एक राऊंड मॅगझिनसह दोन इसमांना अटक केली आहे. उरण पोलिसांचे शनिवारी (११) ऑपरेशन ऑल आऊट सुरू होते.वपोनि सचिन पाटील यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांचे पथक मध्यरात्रीच्या सुमारास उरण ओएनजीसी प्रकल्पाच्या जवळच असलेल्या पीरवाडी हेलिपॅडवर पोहचले.या हेलिपॅडवर उभ्या असलेल्या महिंद्र कंपनीची थार कंपनीची काळ्या रंगाची एमएच -०२-ईयु- ५२९४ क्रमांक असलेली जीप उभी होती. त्यामध्ये समोर दोन इसम व पाठीमागील सीटवर एक महिला तिच्या मुलासह बसलेली होती. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला इसम नील मुन्ना राजभर (३५) रा.वारिक आळी -नागाव उरण याची वपोनि सुनील पाटील यांनी चौकशी केली.मात्र चौकशीत तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.

त्याशिवाय त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची पोलिसांनी अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक काळ्या रंगाचे लोखंडी धातूचे भारतीय बनावटीचे पिस्टल मिळून आले. मात्र त्यात मॅगझिन नव्हते. बाजूच्या सीटवर बसलेला त्याचा मित्र राज थळी (३२) रा.काठेआळी नागाव-उरण याचीही अंगझडती घेतली असता त्याच्या जिन्स पॅन्टच्या खिशात पिस्टलचे मॅगझिन मध्ये एक जिवंत राऊंड आढळून आले. सदर पिस्टलची मॅगझिनसह किंमत अंदाजे रु.२५ ,०००/- व जीपची किंमत अंदाजे रु. ९ ,०० ,०००/- असे एकूण ९,२५ ,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन
उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन दोन्ही इसमाना अटक केली आहे.चौकशीत त्यांच्याकडे पिस्टल बाळगण्याचा परवाना नसल्याचे उघडकीस आले आहे.पिस्टल कुठून व कशासाठी आणले याचा
कसून तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *