ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुक्या दोन घरफोड्यांनी हादरला- १० लाख रूपयांचा ऐवज चोरला

October 27, 202113:45 PM 14 0 0

उरण ( संगिता पवार ) : उरण तालुक्यात मागील तीन-चार दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या झाल्या असून लाखो रूपयांचा ऐवज या वेळी चोरीला गेला आहे. एक घरफोडी २० तारखेला पागोटे गावात झाली तर दुसरी चोरी उरण शहरात रविवारी झाली. पागोटे येथिल घरफोडीत सुमारे ६ लाख ४२ हजार रूपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम तर उरण येथिल चोरीत ४ लाख २२ हजार रूपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे.

पागोटे गावातील चंद्रकांत गजानन पाटील यांच्या घराचे दरवाजाचे ग्रील तोडून कपाटातील .१)१,८0,000/-रूपये किमंतीचे सोन्याचे गठण ४५ ग्रम वजनाचे कि.अ.२)१,00,000/-रूपये किमंतीचे सोन्याची कानातील कुढी साखळीसह २५ ग्रम वजनाची कि.अ.३)५0,000/-रूपये किमंतीचे सोन्याची कानातील झुमके साखळीसह १२.५ ग्रम वजनाचे कि.अ.४)६,000/-रूपये किमंतीचे सोन्याचे सहा लहान मनी व तीन मोठे मनी १.५ ग्रम वजनाची कि.अ.५)१६,000/-रूपये किमंतीचे सोन्याच्या 0.५ ग्रम वजनाच्या ८अंगठया एकुण ४ ग्रम वजनाच्या कि.अ.६)१६,000/-रूपये किमंतीचे सोन्याचे कानातील छोटे दोन टाप ४ ग्रम वजनाचे कि.अ.७)२0,000/-रूपये किमंतीचे सोन्याची एक अंगठी ५ ग्रम वजनाची कि.अ.८)३६,000/-रूपये किमंतीचे सोन्याच्या तीन अंगठया प्रत्येकी तीन ग्रम वजनाच्या एकुण ९ ग्रम वजनाच्या कि.अ.९)१,00,000/-रूपये किमंतीचे सोन्याचा एक नेकलेस २५ ग्रम वजनाचा कि.अ.१०)४0,000/-रूपये किमंतीचे सोन्याचे कानातील दोन झुमके १0 ग्रम वजनाचे कि.अ.११)८,000/-रूपये किमंतीचे सोन्याची नाकातील नथ 2 ग्रम वजनाचे कि.अ.१२)४,000/-रूपये किमंतीचे सोन्याचे लहान सहा मनी १ ग्रम वजनाचे कि.अ.१३)८,000/-रूपये किमंतीचे सोन्याच्या दोन अंगठया एक ग्रम वजनाची प्रत्यकी अषा २ ग्रम वजनाच्या कि.अ.१४)१४,000/-रूपये किमंतीचे सोन्याच्या दोन ढवळया ३.५ग्रम वजनाच्या कि.अ.१५)२१,000/-रूपये किमंतीचे चांदीचे आठ पैजन जोडे ३५0 ग्रम वजनाचे या कि.अ.१६)२३,५00/-रूपये रोख रक्कम एकुण६,४२,५00/-रूपये किंमतीचे सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम तर उरण येथिल नलिनी जयराम घरत यांच्या घरातून १) १,३६,000/- किंमतीचे सोन्याचे बाजुबंद २) १,३६,000/-रू किंमतीचे सोन्याचा लहान हार ३४ ग्राम ३) १,५0,000/- रू रोख ४,२२,000/- चोरट्यांनी चोरून नेला आहे. या चोरीची उरण पोलिस ठाण्यात तक्रार नोंदण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *