ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक महिलादिनीच बलात्काराच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली

March 10, 202113:44 PM 135 0 0

नागपूर : दरवर्षी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. आज या दिनानिमित्त शहरात कर्तृत्ववान महिलांचा ठिकठिकाणी गौरव करण्यात येत असताना दुसरीकडे महिलांविरोधात होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांची पोलीस नोंद करीत होते. सोमवारी महिलादिनी उपराजधानीत अत्याचाराच्या दोन वेगवेगळया घटना समोर आल्या. यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेविषयी करण्यात येत असलेले दावे फोल ठरत असल्याचे दिसते. पहिली घटना बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत उजेडात आली. अंबाझरी मार्गावरील एका नामांकित बहुमजली रुग्णालयातील डॉक्टरने विवाहित परिचारिकेवर रुग्णालयामध्येच बलात्कार केला. तिचे अश्?लील फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी डॉक्टरला अटक केली. अमरदीप क्रीष्णाजी मंडपे असे आरोपीचे नाव आहे. पीडित ३५ वर्षांची महिला गेल्या काही वर्षांपासून शंकरनगरातील एका नामांकित रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. आरोपी डॉक्टर अमरदीप मंडपेसुद्धा तेथे शस्त्रक्रिया गृहात कार्यरत आहे. अमर विवाहित असून त्याला पत्नी व दोन मुले आहेत. तर परिचारिकेला एक मुलगी आणि पती नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो. सोबत काम करीत असताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोघेही एकमेकांच्या जास्त संपर्कात राहायला लागले. आरोपीने तिला ऑक्टोबर २०२० मध्ये रुग्णालयाच्या सहाव्या माळ्यावर नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, अमरने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने मोबाईलने या प्रकाराची चित्रफितही तयार केली. तिचे अश्लील फोटोही काढले. रुग्णालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील छायाचित्र व चित्रफित टाकण्याची धमकी देऊन आरोपी शारीरिक संबंध निर्माण करतो. त्याच्या नेहमीच्या त्रासाला ती कंटाळून तिने अखेर पोलिसांत तक्रार दिली.
विद्यार्थिनीवर अत्याचार
एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची शहरातील दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी बादल प्रमोद गोस्वामी (२१, अमरनगर) याला अटक केली. पीडित मुलगी ही अकराव्या वर्गात शिकते. फेसबुकवर तिची बादलसोबत ओळख झाली. बादलने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. बादल हा वस्तीतच राहत असल्याने तिने त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. अधूनमधून ते व्हॉट्सअ?ॅपवर संवाद साधत होते. एक दिवस त्याने तिला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो तिला धमकी देऊन वाटेल तेव्हा बोलावत असे. रविवारी रात्रीही बादलने तिला आपल्या घरी बोलावले व तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून बादलला अटक केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *