ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नागपुरात दोन बहिणींचा भूकबळी

January 7, 202112:11 PM 60 0 0

नागपूर : उपासमारीमुळे दोन बहिणींचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून बंद घरात त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी उघडकीस आली.

कल्पना नागोराव लवके (३१) आणि पद्मा लवके (६०) अशी मृत बहिणींची नावे आहेत. दोघीही बहिणी अविवाहित होत्या व काही प्रमाणात मनोरुग्ण असल्याची चर्चा परिसरात आहे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघीच राहायच्या. रोजगार काहीच नव्हता. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद असायचे.

बुधवारी नगरपरिषदेचा कर्मचारी संपत्ती कर वसुलीसाठी गेला असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण, आतून दुर्गंध येत असल्याने दार ढकलून बघितले असता दोघींचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता. आत्महत्येच्या कुठल्याही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा मृत्यू उपसारमारीमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे योग्य कारण स्पष्ट होईल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *