ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्याना अमृत महोत्सव नावाची दोन हजार पत्रे : जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस

August 29, 202114:52 PM 13 0 0

जालना (प्रतिनिधी) ः भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आ. बबनराव लोणीकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शुकवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या परिसरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथून राज्याचे मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांना अमृत महोत्सव नावाची दोन हजार पत्रे पाठविण्यात आली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस यांनी दिली.


प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात प्रा. जोगस यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी 15 ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात हीरक महोत्सव असल्याचे म्हंटले तसेच स्वातंञ दिन, स्विय सहाय्यकास विचारुन सांगितला त्यामुळे मुख्यमंत्री महोदयास सदरील वर्ष अमृत महोत्सव असून स्वातंञ दिन 75 वा आहे, हे त्यांच्या लक्षात रहावे याकरिता भाजपा युवा मोर्चाने महाराष्ट्रातून 75 हजार तर जालना जिल्ह्यामधुन दोन हजार पत्रे पाठविले असल्याचे प्रा. जोगस यांनी म्हटले आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस, युवा मोर्चा जालना जिल्हा उपाध्यक्ष संदीप हिवराळे, जिल्हा सरचिटणीस शिवराज नारीयलवाले, जिल्हा क्रीडा संयोजक सचिन जैस्वाल, तालुका उपाध्यक्ष करण निकाळजे, शहराध्यक्ष सचिन नारीयलवाले, क्रांती खांबायतकर, सरचिटणीस विनोद दळवी, चिटणीस संतोष रौत्रे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *