ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

यु. ए. एस. कॉलेज ऑफ मॅनॅजमेण्ट अँड टेकनॉलॉजी आयोजित करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न

February 28, 202214:15 PM 42 0 0

रायगड ( देवयानी कुलकर्णी) उरण एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी संस्थेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयम् सेवकांसाठी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन शिबिर दि.२३ फेब्रुवारी २०२२ रोजीआयोजित केले होते.या उपक्रमास प्रमुख वक्ते म्हणून भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील प्राचार्य कुलदीप भालेराव यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी कुलदीप भालेराव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, नर्सिंग आणि इतर करियर पर्यायाबद्दल विस्तृत माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राचार्य हेमांगी म्हात्रे आणि प्रा.एस.एस रंजन, प्रा. प्राची धोत्रे, प्रा. मनाली हळदणकर यांनी विशेष मेहनत केली. हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनाली म्हात्रे यांनी निमंत्रित व आयोजकांचे विशेष आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *