जालना – महाआवास अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे मुल्यमापन करुन जालना जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या बदनापूर तालुक्यातील उज्जैनपूरी ग्रामपंचायतला उत्तेजनार्थ सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालया च्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, श्रीमती प्रभाताई गायकवाड, भागवत रक्ताटे, कल्याणराव सपाटे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, समाजातील प्रत्येक गोर गरिबाला त्याचे स्वतःचे व हक्काचे घर असावे अशी अपेक्षा असते. गोरगरिबांच्या हक्काच्या घराची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत जालना जिल्ह्याला अधिक प्रमाणात घरे मिळण्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्नशील असल्याचे सांगत गतवर्षात जिल्ह्यासाठी ४ हजार घरकुले मंजुर करुन घेतली असुन चालु वर्षात १० हजार घरकुलांची मागणी जिल्ह्यासाठी करण्यात आली असल्याचेही श्री टोपे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर आयोजित विशेष समारंभात प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून उत्तेजनार्थ पुरस्कार उज्जैनपुरी (ता. बदनापुर) ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. संगिताताई रामेश्वर वाघ व ग्रामसेविका अंबुलगे पुष्पाताई (महाजन) यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सरपंच सौ. संगिताताई वाघ व ग्रामसेविका पुष्पाताई अंबुलगे यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असून या पुरस्कारामुळे अनेकांनी त्यांचे स्वागत केले आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी, संरपच, सदस्य, आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply