ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी उमेश भोईर

November 10, 202116:56 PM 18 0 0

उरण दि 10(राघवी ममताबादे ) काँग्रेस पक्ष मजबूत, सक्षम करण्यासाठी संघटनात्मक दृष्ट्या विविध विभागाशी संबंधित मोर्चेबांधणी करण्यात आली असून काँग्रेस पक्षाचा तळागाळात प्रचार, प्रसार करण्यासाठी रायगड जिल्हा ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी उरण तालुक्यातील कळंबुसरे येथील रहिवासी तथा काँग्रेसचे एकनिष्ठ कट्टर कार्यकर्ते उमेश भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

उमेश चावजी भोईर हे काँग्रेसचे एक निष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी कोप्रोली पूर्व विभाग अध्यक्ष, उरण तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष ,कॉंग्रेस सदस्य उरण,तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष म्हणून काम केले आहे.सध्या उमेश भोईर हे उरण तालुक्यातील कलंबुसरे ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ती रायगड जिल्ह्याच्या ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे.रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष जे डी जोशी, उरण तालुका सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत,उरण तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष जयवंती गोंधळी, उपाध्यक्ष रामकृष्ण म्हात्रे, उपाध्यक्ष जयवंत पडते,अध्यक्ष सदानंद पाटील, अध्यक्ष भालचंद्र घरत,शहर सेवादल महिला अध्यक्ष चंदा मेवाती, केगाव अध्यक्ष रेखा धनसरे,उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष सुनील काठे,महालन विभागीय अध्यक्ष जी डी पाटील आदी मान्यवरांनी त्यांचे गुलाबपुष्प देऊन, मिठाई वाटप करून त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *