ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जून्या जालन्यातील अनाधिकृत अतिक्रमण हटवावे- साद बीन मुबारक

March 31, 202214:36 PM 26 0 0

जालना/प्रतिनिधी : जूना जालना, भागातील बाजार चौकीसह अन्य भागातील अनाधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी मागणी अ‍ॅन्टी करप्शन अ‍ॅण्ड क्राईम कंट्रोल कमिटीचे जिल्हाध्यक्ष साद बीन मुबारक यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जून्या जालन्यातील बाजार चौकी, मिलन चौक, दुःखीनगर, शनिमंदीर, नुतन वसाहत व इतर भागात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आले आहे. या जागेवर वाहने उभे करणे, दुकाने , टपर्‍या, नालीवर दुकाने बनविलेली आहे. यामुळे नगर पालिका स्वच्छता देखील व्यवस्थीत करू शकत नाही. अतिक्रमणामुळे नागरिकांना येणे- जाणे करणे मुश्कील होवून बसले आहे. महिलांनाही अडचणी येत आहे.

कोणाला काही बोलण्यास गेले तर लगेच तेथे भांडणे सुरू होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. अतिक्रमण धारक हे अरेरावी, शिवीगाळ करणे, कचरा रस्त्यावर फेकणे असे प्रकार करीत आहे. तसेच घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे. या भागामध्ये कचरा गाडी देखील कधी येते व कचरा देखील वेळेच्या वेळी साफ होत नाही. तसेच या भागात एखादी अ‍ॅम्ब्युलन्स आली तर तिला रस्ताही मोकळा केला जात नाही. विशेष म्हणजे येथे साफसफाई होत नसून, मुळ कामगार घरी बसून दुसरे लोक काम करीत आहे. नगर पालिकेमध्ये अनागोंदी कारभार सुरू आहे. सफाई कामगारांवर कोणाचेही नियंत्रण नाही. स्वच्छता निरीक्षकही भागात आढळून येत नाही. सद्या रस्ते दुरूस्तीचे व नवीन रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे. परंतू घाणीमुळे व अतिक्रमणामुळे या रस्त्याचा कोणताही उपयोग होत नाही. यामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ अतिक्रमण व स्वच्छतेचा प्रश्‍न हाताळावा, अशी मागणीही साद बीन मुबारक यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *