ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचा विजय निश्चित

July 27, 202212:32 PM 23 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचा विजय निश्चित – महेंद्र अवघडे माण तालुका प्राथमिक शिक्षक संघ ही स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विचारावर विश्वास ठेवून काम करणारी संघटना आहे.संघटनेचे जिल्ह्याचे खंबीर नेते सिद्धेश्वर पुस्तके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघाने शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत.प्राथमिक शिक्षक बँकेतही सभासद हिताचा कारभार केला असून आगामी शिक्षक बँक निवडणुकीत शिवाजीराव पाटील यांच्या विचारावर सिद्धेश्वर पुस्तके यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन व शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी केले.
दहिवडी येथे झालेल्या शिक्षक संघाच्या सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी शंकरराव शिंदे,मोहन जाधव, सुभाष गोंजारी,सुगंधराव जगदाळे, बाळासाहेब पवार,हरीश गोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.राजाराम खाडे म्हणाले,शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत.सभासद हितासाठी कर्जाचे व्याजदर, मयत सभासद कर्जमाफी यासारखे निर्णय घेऊन शिक्षक संघाने सभासदांची मने जिंकली आहेत.
श्री शंकरराव शिंदे म्हणाले, शिक्षक संघाच्या व्यासपीठावरच शिक्षकांचे अनेक प्रश्न सुटले आहेत त्यामुळे शिक्षक संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संचालक मंडळाने उत्तम काम केले आहे.

श्री. सुगंधराव जगदाळे यांनी माण तालुक्यात संघटना मजबूत असून संघ विचाराचा कार्यकर्ता बँकेचा संचालक होईल असे सांगितले.
यावेळी बाळासाहेब पवार,राजाराम पिसाळ,, राजाराम तोरणे, महेश माने,पोपट जाधव,पुंडलिक खराडे,शशिकांत खाडे,महेंद्र कुंभार यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन रामभाऊ खाडे यांनी केले तर आभार संतराम पवार यांनी मानले.
यावेळी सुरज तुपे,दिपक पतंगे,दिलीप गंबरे,महेश कुचेकर, विश्वास अर्जुन, आनंदराव भुजबळ,बळीराम विरकर,अजिनाथ गलांडे,दत्ता कोळी,दत्ता खाडे,विक्रम माने,नथुराम जाधव,दत्ता गलांडे,विशाल अडसूळ,महादेव जाधव व शिक्षक उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *