जालना (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन वाढीसह त्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी जिल्हा आणि राज्यपातळीवरील काम करणार्या पदाधीकार्यांच्या सहकार्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी जालना मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अविना कव्हळे यांनी जिल्हाभरात दौरा करुन पत्रकारांच्या समस्या समजून घेणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जालना येथे आयोजीत करण्यात आलेल्या एका बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत. त्या त्यांना मांडता याव्यात व त्यांच्यापर्यंत संघटनेच्या पदाधीकार्यांनी त्यांच्यापर्यंत जाऊन चर्चा करण्याचे ठरविले आहे. यावेळी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुहास कुलकर्णी, उपाध्यक्ष राजेश भालेराव, कोषाध्यक्ष अच्युत मोरे, साहिल पाटील यांची उपस्थिती होती.
Leave a Reply