ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

,देशातील बेरोजगारीमुळे सामान्य जनतेचे जगने कठिण ः आ. गोरंट्याल

June 20, 202112:49 PM 85 0 0

जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील भाजपा सरकारने केलेली भरमसाठ इंधन दरवाढ प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी शेतकऱ्यांविरोधी केलेली तीन काळे कायदे आदीप्रश्‍नांच्या विरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पदिन साजरा करून केंद्र सरकारच्या विरोधात शनिवार रोजी अंबड चौफुली येथे जोरदार निदर्शने करण्यात आले.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात शनिवारी संपुर्ण राज्यामध्ये आंदोलन उभारण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पदिन म्हणून जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख बोलतांना म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील सर्वसामान्य माणूस आणि कष्टकरी शेतकरी रसातळाला पोहचला आहे. बेरोजगारी वाढल्याने देशामध्ये कोट्यावधी युवक बेरोजगार आहेत. त्यांचा जीवना मरणाचा प्रश्‍न असतांना केंद्र सरकार याकडे कानाडोळा करीत असल्याचे श्री देशमुख म्हणाले.
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संपुर्ण देश काळोखात लोटला गेल्याने देशाचे भविष्य आंधारमय बनले आहे. भाजपाने जाती-पातीचे राजकारण करून देशात विष पेरण्याचे काम केल्यामुळे सामाजीक बांधीलकीला मोठी ठेस पोहचली आहे. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, मोदी सरकार सर्व आघाड्यांवर फेल झाल्याने गरीब जनतेला जगने कठिण झाले आहे. केंद्र सरकार देशातील भाजप विरहित राज्य सरकारांना तुच्छतेची वागणूक देवून त्यांचा छळ करीत आहे. ही बाब देशाच्या लोकशाहीसाठी मोठी हानीकारक आहे. देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न ज्वलंत असतांना मोदी सरकार भांडवलदारांच्या पाठिशी उभे राहून शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगीतले. आ. गोरंट्याल पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाच्या माध्यमातून “महंगाई हटाना है, राहुल गांधी को लाना है” हे घोषवाक्य भविष्यामध्ये खरे ठरणार असून मोदी सरकार तोडावर पडणार आहे यात तिळमात्र शंका नसल्याचे श्री गोरंट्याल यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, माजी जिल्हाध्यक्ष आर. आर. खडके, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा विमलताई आगलावे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारचा निषेध नोंदवून वाढलेली महागाई कमी करण्यात यावी. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्‍न व तसेच स्वयंपाक गॅसचे दर तात्काळ कमी करण्यात यावे. अशी जोरदार मागणी यावेळी केली.
प्रस्ताविक करतांना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगीतले की, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले आंदोलन यापुढे अक्रमक पध्दतीने करण्यात येईल. केंद्र सरकारने वाढती महागाई, बेरोजगाराचे प्रश्‍न, इंधन दरवाढीत झालेली भरमसाठ वाढ ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी मागणी शेख महेमूद यांनी याप्रसंगी केली.
या प्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठलसिंग राजपुत, बदर चाऊस, शेख शकील, डॉ. विशाल धानुरे, एकबाल कुरेशी, चंद्रकांत रत्नपारखे, आशोक उबाळे, राजेंद्र गोरे, शितलताई तनपुरे, शेख शमशु, फकीरा वाघ, समाधान शेजुळ, गजानन शेजुळ, नारायण वाढेकर, कृष्णा पडुळ, सुषमाताई पायगव्हाणे, मंगलताई खांडेभराड, चंदाताई भांगडीया, अंजाभाऊ चव्हाण, योगेश पाटील, मनोहर उघडे, रहिम तांबोळी, संभाजी गुढे, शिवप्रकाश चितळकर, नदीम पहेलवान, अनस चाऊस, गणेश वाघमारे, शेख इब्राहिम, दाविद गायकवाड, जावेद अली, राहुल साळवे, शेख रहिस, नंदाताई पवार, विजयाश्री ढाकणे, गंगाताई काळे, शेख शाहिन, बाबासाहेब सोनवने, वल्लभ कुलकर्णी, रघविर गुढे, संतोष खरात, महेंद्र रत्नपारखे, प्रविण रत्नपारखे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला काँग्रेसचे मोदी रेसीपीने केले लोकांना आकर्षक
महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमलताई आगलावे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलनात मोदी रेसीपी बिन तेलाचे पदार्थ तयार करून आंदोलनाच्या ठिकाणी बिन तेलाचे वडे, बिन तेलाचे वरण, बिन तेलाची आमटी, बिन तेलाचे धपाटे आदी पदार्थ आंदोलनाच्या ठिकाणी प्रदर्शनाला ठेवण्यात आले होते. महिलांच्या या अभिनव आंदोलनाकडे लोकांचे मन आकर्षीत झाले. महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनास सहभाग नोंदविल्याने आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी त्यांच्या अभिनव आंदोलनाचे कौतूक केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *