ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग आणि आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीटी येथे ड्वार्फ कंटेनर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

September 21, 202113:10 PM 12 0 0

उरण(संगिता पवार) 20 सप्टेंबर, 2021: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीटी येथे ड्वार्फ कंटेनर ट्रेनला आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवेचा आरंभ केला. यावेळी डाॅ संजीव रंजन, भा.प्र.से., सचिव, बंदरे, नौकायन व जलमार्ग मंत्रालय, जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से., उपाध्यक्ष श्री उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. उपस्थित होते. मंत्रीमहोदयांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर बंदरातील ड्वार्फ कंटेनर डेपो (डीसीडी) मधून ड्वार्फ कंटेनरची पहिली खेप ड्वार्फ कंटेनर ट्रेनद्वारा आयसीडी कानपूरला रवाना झाली.


आयात-निर्यात मालाची एकावर एक रचलेल्या ड्वार्फ कंटेनरद्वारे वाहतुक केल्याने आयात-निर्यात समुदायास आपल्या मालाची स्पर्धात्मक दराने वाहतुक करता येईल व पर्यायाने बंदरातून रेल्वेद्वारे होणा-या मालवाहतुकीमध्ये वाढ होईल. अशारीतीने ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा सुरू झाल्यामुळे जेएनपीटी बंदरास याचा लाभ होणार. ‘ड्वार्फ कंटेनर’ ची उंची सामान्य आयएसओ कंटेनरपेक्षा 660 मिमी कमी असल्याने त्याचा एक लॉजिस्टिक लाभ होतो. कंटेनरची ऊंची कमी असल्याने असे कंटेनर लोड केलेले ट्रेलर ग्रामीण, अर्ध शहरी आणि शहरी रस्त्यांवरील मर्यादित उंचीच्या भुयारी मार्गांमधून आणि विद्युतीकृत विभागात लेव्हल क्रॉसिंगमधून सहजरित्या जाऊ शकतात.

शिवाय, ‘ड्वार्फ’ कंटेनरची एकावर एक ठेवून वाहतुक केल्याने 67% अधिक मालाची वाहतुक होते व 40 टन क्षमतेच्या आयएसओ कंटेनरच्या तुलनेत ‘ड्वार्फ’ कंटेनर मधून 71 टन मालाची वाहतूक केली जाऊ शकते. याशिवाय, भारतीय रेल्वेद्वारा डबल स्टॅक आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅक ड्वार्फ कंटेनर मालवाहतुकी शुल्कामध्ये 17% सूट दिली जाणार आहे, परिणामी गुंतवणुकदारांना शुल्कामध्ये एकूण 33% प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे ड्वार्फ कंटेनरची रेल्वेद्वारे वाहतुक झाल्याने आयात-निर्यात मालवाहतुक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे, ज्यामुळे भारतीय मालाची निर्यात जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दराने करता येईल.
ड्वार्फ कंटेनर ट्रेनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय बंदरे, नौवहन, जलमार्ग व आयुष मंत्री, श्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “जेएनपीटीद्वारा ड्वार्फ कंटेनर ट्रेन सेवा सुरू करणे हे डबल स्टॅक्ड ड्वार्फ कंटेनरद्वारा आयात-निर्यात मालाची रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे

 

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *