ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांची जेएनपीए बंदरास भेट

May 19, 202214:30 PM 34 0 0

उरण (संगिता पवार) : केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, श्री सर्बानंद सोनवाल यांनी आज भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदरास अर्थात जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेलवे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी श्री सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराचा पहिला सस्टेनबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला व बंदरातील विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.
जेएनपीए बंदराचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. व उपाध्यक्ष श्री उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल आणि इतर मान्यवरांचे स्वागत केले. श्री सर्बानंद सोनोवाल यांना केंद्रीय औद्योगिक दलाच्या जवानांनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदराने 33 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केल्याबद्दल बंदर प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी श्री सोनोवाल म्हणाले केंद्रीय बंदरे, जहाजवाहतुक आणि जलमार्ग मंत्रालयाच्या प्रधानमंत्री गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन, सागरमाला, मरीटाइम इंडिया विजन (एमआयवी) 2030 सारख्या सर्व उपक्रमांमध्ये जेएनपीए बंदर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या तीन दशकांतील समर्पण आणि योगदान यामुळे जेएनपीए बंदर जागतिक स्तरावर नावरूपास आले आहे.”
जेएनपीए बंदरातील विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय मंत्री महोदयांना माहिती देताना बंदराचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “जेएनपीएमध्ये अनेक पायाभूत सुविधा आणि इतर विकासात्मक प्रकल्प व हरित बंदर उपक्रम सुरू आहेत ज्यामुळे जेएनपी बंदराच्या व्यवसायात वाढ होईल व पर्यायाने देशाच्या आयात-निर्यात व्यापारास चालना मिळेल. आमचे सर्व प्रकल्प मंत्रालयाच्या उपक्रमांशी अनुरूप आहेत ज्यामुळे मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक खर्चात कपात आणि व्यवसाय करणे सुलभ होते.
श्री संजय सेठी पुढे म्हणाले, “मला हे सांगताना आनंद होत आहे की, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आमचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी आम्ही 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आमचा पहिला शाश्वतता (सस्टेनबिलिटी रिपोर्ट) अहवाल प्रसिद्ध केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहोत.
जेएनपीए हे देशातील पहिले बंदर आहे जे पूर्णपणे डीएफसी अनुरूप आहे. नवी दिल्ली ते जेएनपीए बंदरा पर्यंत डीएफसीसीआयएल सुसंगत रेल्वे ट्रॅक टाकले जात आहेत आणि जेएनपीए बंदर परिसरातच लोडिंग यार्ड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या कॉमन यार्डमध्ये डबल-स्टॅक कंटेनर ट्रेनसाठी 1500 मीटरच्या 3 लाइन्स असतात, त्यापैकी दोन कंटेनर लोडिंग आणि अनलोड करण्यासाठी टॉप वायर्ड बॅलास्टलेस लाइन्स असतात आणि एक इलेक्ट्रिक इंजिनच्या इंजिन टर्नअराउंडसाठी असते.
जेएनपीए देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे. वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि सर्वोत्तम यंत्रणा प्रदान करून तसेच व्यापार वर्गाच्या पसंतीचे बंदर बनून जागतिक पुरवठा साखळींमध्ये सखोल एकीकरणास समर्थन देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *