ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय मंत्री श्री सर्बानंद सोनवाल यांनी जेएनपीटीच्या हरित उपक्रमांचा घेतला आढावा

January 30, 202213:33 PM 39 0 0

उरण(संगीता पवार) : भारतातील प्रमुख कंटेनर बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) अनेक हरित प्रकल्प राबवित आहे. शनिवार दि. 29 जानेवारी रोजी केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग मंत्री श्री सर्बानंद सोनवाल यांनी देशात हरित बंदरे आणि हरित जहाजवाहतूकीच्या विकासासाठी ‘मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030’ नुसार राबविण्यात येत असलेल्या विविध हरित उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सर्व प्रमुख बंदरे, सीएसएल आणि आईडब्ल्यूएआईच्या प्रमुख अधिका-यां सोबत बैठक घेतली. बैठकी दरम्यान जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. यांनी जेएनपीटीच्या हरित बंदर उपक्रमांविषयी माहिती दिली. श्री सेठी म्हणाले, “जेएनपीटीने बंदराच्या सर्व क्रियाकलापांचा समावेश असलेला एक कृती आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये माल हाताळणी, साठवण, निर्गमन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर अनेक कार्यांचा समावेश आहे.

जेएनपीटी मध्ये टग आणि बंदर नौकांना बंदरामध्येच किना-यावर वीज पुरवठा केला जातो, त्याचबरोबर कंटेनर हाताळणी साठी ई-आरटीजीसीचा उपयोग यासारखे अनेक पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवितो. आम्ही जेएनपीटीशी संबंधित इलेक्ट्रिक वाहनांवर सौर पॅनेल बसविले आहेत. जेएनपीटीने माल हाताळणी, साठवणूक, निर्गमन आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित इतर अनेक क्रियाकलापांसह बंदरातील सर्व कार्यांचा समावेश असलेला एक कृती आराखडा तयार केला आहे.” मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 अंतर्गत, आम्ही जेएनपीटी मध्ये 60% अक्षय उर्जेचा उपयोग, तसेच पर्यावरण अनुकूल विविध प्रकारच्या इंधनाचा (सीएनजी/विद्युत/एलएनजी) उपयोग, किनारा उर्जा आपूर्ति, एलएनजी बंकरिंग, ऊर्जा कार्यक्षम स्मार्ट विद्युत व्यवस्था, ग्रीन बेल्ट कव्हर, जलसंधारण/सांडपाणी प्रक्रिया, 2.5एमडब्ल्यूपी सौर संयंत्र स्थापित करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट शाश्वत विकासासाठी सदैव कटिबद्ध असून पर्यावरवरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही पुरेशा उपाययोजना केल्या असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार अजूनही वाढ केली जात आहेत. जेएनपीटीकडे एकूण सुमारे 3402 हेक्टर जमीन उपलब्ध आहे, त्यापैकी 1147 हेक्टर क्षेत्र (34%) हरित आच्छादनाखाली आहे, त्यामध्ये खारफुटीचाही समावेश आहे. बंदराच्या परिसंस्थेत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वनस्पती व जीवजंतु आहेत. बंदर स्तरावर जागतिक हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आम्ही “हरित बंदर दर्जा” (ग्रीन पोर्ट स्टेटस) प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *