ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचेकडून डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक

October 4, 202113:21 PM 46 0 0

कराड पाटण प्रतिनिधी (सुप्रिया कांबळे) इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वल्र्ड रेकाॅर्ड यामध्ये एकदा नाव नोंदवलेले पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्‍वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांचे मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले. पुणे येथील एका कार्यक्रमादरम्यान डाॅ.डाकवे यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे सुंदर रेखाचित्र त्यांना भेट दिले. ते दिल्यानंतर ‘‘अरे वा…खूपच छान…अभिनंदन…!’’ अशा शब्दांत त्यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे कौतुक केले तसेच त्यांनी डाॅ. डाकवे यांच्या कलेची व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.


दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड, खा.हेमंत पाटील, सहकार परिशदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, किरण ठाकूर, श्रीराम पवार, भूषण करंदीकर, राजेंद्र हुंजे, प्रसन्न जोशी, राजश्री पाटील यांच्या नावातील अक्षरगणेशा त्यांना भेट दिले. यावेळी डाॅ.डाकवे यांच्यासमवेत राजेश निंबाळकर, सुयोग कुलकर्णी, किरण शिर्के, समीर करपे व अन्य मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट व डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *