जालना, दि. 28 :- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे युनिट क्र.1 अंकुशनगर व युनिट क्र.2 (सागर) तिर्थपुरी या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सन्माननीय संचालक मंडळ व सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री, तथा पालकमंत्री राजेश टोपे, यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, संचालक सर्वश्री सरदारसिंग पवार, सुरेशराव औटे, शेषराव जगताप, विकास कव्हळे, किरण तारख, नरसिंगराव मुंढे, बाबासाहेब कोल्हे, कैलास जीगे, पाराजी सुळे, दत्तु जाधव, त्र्यंबकराव बुलबुले, अशोक आघाव, सदशिव दुफाके, भागवतराव कटारे, सिताराम लहाने, अशोक चिमणे, संजय कनके, कल्याण सपाटे, अशोक शिंदे, रमेश पैठणे, रजिय्योद्दीन पटेल, भाऊसाहेब कनके, बयाजी जायभाय, बाबासाहेब बोंबले, अमोल लहाने, संजय टोपे, बापुराव खटके,रईस बागवान, बाळासाहेब नरवडे,कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी.टी.पावसे, कार्यकारी संचालक दिलीप पाटील त्याचबरोबर कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, आधिकारी, कर्मचारी, ऊस तोड वाहतुक कंत्राटदार, मजुर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले मागील हंगाम 2021-22 मध्ये युनिट क्र.1 अंकुशनगर येथे 8,22,029.400 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 8,43,240क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.26 टक्के मिळाला आहे. तसेच युनिट क्र.2 (सागर) तिर्थपुरी येथे 5,25,095.301 मे.टन ऊसाचे गाळप होऊन 5,40,900 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.30 टक्के मिळाला आहे. या हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याने 2 हजार 485 रुपये प्रती मे.टन प्रमाणे ऊस दर अदा केला आहे. कारखान्याचे अकर्शाळा प्रकल्पामध्ये 54.71 लाख बल्क लिटर्स अल्कोहोलचे व 55.11 लाख बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले. वीज निर्मिती प्रकल्पामध्ये 8.07 कोटी युनिट वीज निर्मिती झाली त्यापैकी कारखान्याने स्वत:साठी 2.67 कोटी युनिट वीजेचा वापर केला व उर्वरीत 5.39 कोटी युनिट वीज महवितरण कंपनीस विक्री केली आहे. चालु गळीत हंगाम 2021-22 करीता कारखान्याचे कार्यक्षेत्रात सुरु व खोडवा मिळून 27172.00हेक्टर ऊस क्षेत्र आहे. यापासून सरासरी अंदाजे प्रति हेक्टरी 80मे.टना प्रमाणे 21.73 लाख मे.टन ऊस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. हंगाम 2021-22 मध्ये कारखान्याचे युनिट क्र.1 अंकुशनगरचे 9.00 लाख मे.टन व युनिट क्र.2 (सागर) तिर्थपुरीचे 6.00 लाख मे.टन असे एकुण 15.00 लाख मे.टन ऊस गळीताचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे.
या हंगामात दोन्ही युनिट कडे उच्चांकी ऊस गळीत व साखर उत्पादन होणार आहे. दोन्ही युनिटचे गाळप वजा जाता कार्यक्षेत्रात अंदाजे 6.73 लाख मे.टन ऊस आतिरिक्त होत आहे. आतिरिक्त ऊसाचे गाळप होण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.कारखान्याचे दोन्ही युनिट कडील रिपेअर अॅण्ड मेन्टेन्स व गाळप क्षमता वाढीची कामे पूर्ण होत आली आहेत, सक्षम ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरली आहे. लवकरच प्रत्यक्ष ऊस गळीतास सुरूवात होणार आहे. या हंगामात बी हेवी टू इथेनॉल, ज्युस टू इथेनॉल व सी मोलासेस टू इथेनॉल निर्मिती करण्याची व्यवस्था केली आहे. रिकव्हरी वाढणे साठी केन सॅम्पल चेक करून, रिकव्हरी पाहून ऊस तोड देण्यात येणार आहे. सर्वंच घटकाने कारखान्याचे हिताची जपणूक करावी. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेने कारखान्याचे सुचनेनुसार नेमून दिलेल्या ठिकाणी काम करणे आवश्यक आहे. त्याचं बरोबर शेती स्टाफने शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोबाईल अॅपद्वारे प्रत्यक्ष शेतक-याचे शेतामध्ये जाऊन ऑनलाईन ऊस नोंद घेतली जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्याने बनविलेल्या अॅपमुळे कोणासही ऊस नोंद किंवा अन्य तपशिलामध्ये फेरबदल करता येणार नाहीत. यामुळे चुकीच्या प्रवृत्तींना मोठया प्रमाणात आळा बसणार आहे. तसेच कारखान्याकडे ऊस वाहतुक करणा-या वाहनांना टॅग बसविलेले आहेत. यामुळे वाहन भरुन कारखान्यावर आलेनंतर सेन्सारद्वारे वाहनाचा क्रम आपोआप काॅम्प्युटर सिस्टीमद्वारे लागेल. यामुळे क्रमवारीनुसार वाहने खाली होतील. ऊसाचे वजन झालेनंतर शेतकरी व तोडणी वाहतुक कंत्राटदारांना एसएमएस द्वारे वजनाची महिती मिळणार आहे. कारखाना गांडुळ खत, कंपोस्ट खताची निर्मिती करत आहे सदर खते जमीनीसाठी उपयुक्त आहेत. सदर खतामुळे ऊस उत्पादन वाढण्यास मदत होत असल्याने शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा. ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा असेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाने इथेनॉल निर्मीतीचे प्रोत्साहनपर धोरणानुसार कारखान्याचे युनिट क्र.1 अंकुशनगरकडील 60 केएलपीडी अत्याधुनिक डिस्टीलरी प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच विस्तरीत क्षमतेने डिस्टीलरी प्रकल्प सुरु होणार आहे. कारखान्याचे युनिट क्र.2 (सागर) तिर्थपुरीकडे 60 केएलपीडी अत्याधुनिक डिस्टीलरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. लवकरच प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार आहे. याच बरोबर कारखान्याचे युनिट क्र.2 (सागर) तिर्थपुरीकडे को-जनरेशन प्रकल्पही उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊस लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यातच मागील हंगामात लागवड केलेल्या ऊसाचे खोडवा मोठया प्रमाणात राहील असा अंदाज आहे. यामुळे पुढील 2022-23 हंगामातही आतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कारखान्याचे दोन्ही युनिटकडील गाळप क्षमता आणखी वाढविण्याचे कामी तज्ञांचा सल्ला घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. नवीन ऊस लागवड करतांना सुधारीत ऊस जातीचा वापर करून कमीत कमी उसाची लागवड करावी असे सांगत समर्थ अंकुशनगर व सागर तिर्थपुरी या कारखान्यांमुळे आपले भागाचा कायापालट झाला आहे. यामध्ये संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे. समर्थचे आर्थिक शिस्तीची व काटकसरीचे धोरणाची दखल देश पातळीवर घेऊन कारखान्यास देश व राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, ऊस विकास व इतर अनेक परितोषीके मिळाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कारखान्याचे सभासद व कर्मचा-यांना दिवाळी निमित्त सवलतीचे दराने प्रत्येकी 10 किलो साखर वाटप करण्यात येत आहे. सभासद बांधवांनी मुदतीत साखर घेऊन जावी. दिवाळीनिमित्त कामगारांना बोनस दिले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते शासन, कारखाना व शेतकऱ्यांच्या सहभागाने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply