ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक हा काळे विधेयक – विशाल उफाड

January 12, 202214:46 PM 55 0 0

जालना-प्रतिनिधी : विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सादर केले. राज्यपालांच्या अधिकारांना कात्री लावण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रस्तावाला भाजपने आधीच विरोध दर्शविला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री हे विद्यापीठाचे प्र-कुलपती असतील अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना विद्यापीठाशी संबंधित सारी माहिती देणे प्रचलित कायद्यात विद्यापीठांवर बंधनकारक नाही. कायद्यात सुधारणा करताना प्र-कुलपती या नात्याने विद्यापीठाशी संबंधित सारी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक हा काळे विधेयक असल्याचे भारतीय जनता पार्टी आघाडीचे जालना शहराध्यक्ष विशाल उफाड यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत विद्यापीठांच्या शैक्षणिक, आर्थिक स्वायत्ततेत शासनाला थेट हस्तक्षेप करण्यास फारशी मुभा नव्हती. मात्र, आता विद्यापीठांच्या कारभारात थेट उच्च शिक्षणमंत्र्यांचा हस्तक्षेप होऊ शकणार आहे.

विद्यापीठाचा अर्थसंकल्प, बृहत आराखडा यांसह विविध मुद्दय़ांचे निर्णय अधिसभेत घेण्यात येत होते. आता शिक्षणमंत्री अधिसभेचे अध्यक्ष असल्यामुळे विद्यापीठांच्या निर्णयप्रक्रियेत शासनाचा वरचष्मा राहील. प्र-कुलपती हे कुलगुरूंच्या वरील पद आहे. कुलगुरू या पदासाठी शिक्षण क्षेत्रातील अनुभव, संशोधन क्षेत्रातील अनुभव असे अनेक निकष आहेत. उच्च शिक्षणमंत्र्यांसाठी शैक्षणिक किंवा गुणवत्तेचे कोणतेही पात्रता निकष नाहीत. त्यामुळे विद्यापीठातील पदरचनेत कुलगुरू पदापेक्षा उच्च शिक्षणमंत्र्यांचे पद वर असण्यावरही शिक्षण क्षेत्रातून आक्षेप घेण्यात येत आहेत.
या अनुशंगाने दि,11 जानेवारी 2022, मंगळवार रोजी जेईएस महाविद्यालय समोर राज्य सरकारचे निषेध करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे सोबत भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष विशाल उफाड, शहर उपाध्यक्ष विकास कदम, अमोल धानुरे, राहुल यादव, विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष रुतुज नावंदर, साहिल कुंटे, सैफ पठाण आदी भाजपा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *