ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी गजानन पाटील वाळके यांची बिनविरोध निवड

October 25, 202113:37 PM 9 0 0

जालना (अनिता पवार):  महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभागाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक व निवड सभा शिक्षक पतसंस्था जालना येथे संपन्न झाली. यावेळी आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी गजानन पाटील वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तर राज्य सचिवपदी उस्मानाबादचे नितीन कोळी, राज्य उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण सपकाळ, मराठवाडा अध्यक्ष राज मो. शेख, मराठवाडा उपाध्यक्ष प्रमोद डोंगरदिवे, जालना जिल्हा नेते शिवहरी ढाकणे व विजय चव्हाण, जिल्हाध्यक्षपदी संतोष कातुरे, सचिव रामदास लाड, सह सचिव पदी संजय गवते, उपाध्यक्ष जयंत कुलकर्णी, कोषाध्यक्ष तुकाराम काकडे, भोकरदन तालुकाध्यक्ष डॉ. दत्ता सपकाळ, उपाध्यक्ष सुधाकर चोपडे, सचिव बडगे जाफराबाद तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चेके, उपाध्यक्ष गजानन फदाट, तालुका सचिव उमेश दुनगहू, अंबड तालुकाध्यक्ष दत्ता काळबांडे, सचिव कैलास राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मनीषा पाटील, उपाध्यक्ष डॉ. शिवनंदा मेहेत्रे, सचिव प्रभा जाधव, सहसचिव जोत्स्ना बिडकर, जालना तालुकाध्यक्ष जयश्री डोईफोडे, बदनापुर तालुकाध्यक्ष विजयमाला मगर यासर्वांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक दिलीप ढाकणे, राज्य नेते के.सी. गाडेकर, बाजीराव ताठे, मराठवाडा अध्यक्ष आर.आर. जोशी, जिल्हाध्यक्ष उद्धव बाजड, जिल्हा नेते बबनराव बोरुडे, एकनाथ खरात, डि.एस. एकघरे, जगत घुगे, ज्ञानेश्वर पठाडे, ज्ञानोबा भांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष कातुरे, रामदास लाड, कैलास राठोड, दत्ता काळबांडे, श्रीकृष्ण चेके, उमेश दुनगहू, शिवहरी ढाकणे, विजय चव्हाण, राज मोहम्मद शेख, तुकाराम काकडे, प्राचार्य मनोज वैद्य, अभय गायकवाड, उद्धव बबीरवाल व आकाश जाधव यांसह अनेक माध्यमिक शिक्षकांनी प्रयत्न केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *