ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदी राजश्री राजेंद्र मोकल यांची बिनविरोध निवड

January 15, 202213:12 PM 53 0 0

उरण(संगिता पवार) : रायगड जिल्ह्यातील नामांकित समजल्या जाणाऱ्या उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या झालेल्या सन २०२१-२०२६ या पंचवार्षिक निवडणुकीत सुभाष भोपी यांच्या स्वाभिमानी शिक्षक मित्र पॅनेलचे १५ उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होऊन संचालक पदी विराजमान झाले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या रोजी झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत स्त्री शक्तीला अभिमानास्पद वाटावे अशा तब्बल ४५ वर्षानंतर पनवेल मधून पहिली महिला चेअरमन होण्याचा बहुमान . राजश्री राजेंद्र मोकल यांना मिळाला तसेच व्हाईस चेअरमन पदी . अविनाश गणा कोळी यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवोदित संचालक मंडळ नवनीत गावंड, . प्रभाकर घरत, . दिपक घरत, .प्रशांत पाटील, . मंदार रसाळ, संजय पाटील, . नितीन कुडावकर, . केसरीनाथ दरे, . रमणिक म्हात्रे, . संदीप पाटील , स्वाती गायकवाड, . शर्मिला गावंड, धनश्री पाटील या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात स्वाभिमानी शिक्षक पॅनेलचे . सुभाष भोपी, पॅनेलप्रमुख जयदास घरत, पॅनेलप्रमुख . नरेश मोकाशी ,गंगाधर पाटील,. निर्भय म्हात्रे, बबन पाटील, राजेंद्र मोकल, . महेंद्र गावंड, संदीप जुईकर, बळीराम पाटील, . के.आर.म्हात्रे, . राजेंद्र शिंदे. प्रितम वर्तक, श्री. विश्वनाथ पाटील,.भरत पाटील, .रवींद्र कोळी, .नितीन गायकवाड .संजय सावळे, . सविता कोळी इ. मान्यवरांनी चेअरमन , व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन कविता गावंड यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *