ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेनेच्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

June 29, 202212:21 PM 17 0 0

जालना, दि. २८(प्रतिनिधी)- मागील आठवडाभरात राज्यात अभुतपुर्व घडामोडी घडून आल्या. त्यात सत्ताधारी शिवसेना पक्षातील मंत्री व आमदारांनी पक्षाशी द्रोह करून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणून दुसNयाबरोबर घरोबा केला. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकही विचलित झाला व पक्षाला फितुर झालेल्या गद्दाराबद्दल प्रचंड संताप त्यांच्या मनात निर्माण झाला. शिवसैनिकांत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए.जे. बोराडे यांनी शिवसैनिकांना दिलासा व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली.
या बैठकीस सहसंपर्वâप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे यांनी शिवसैनिकांच्या संतापजनक भावना समजून घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी एका दिवसाच्या अवधीने जालना जिल्ह्यात समर्थन मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चाला माजीमंत्री अर्जुन खोतकर, सहसंपर्वâप्रमुख शिवाजीराव चौथे, माजी आमदार संतोष सांबरे यांच्या पाठबळ मिळाले. अत्यंत चांगले नियोजन करीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनासाठी एकाच दिवसात मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व सामान्य नागरिक अत्यंत उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले व राज्यातील बंडखोर आमदारांचा तीव्र शब्दांत घोषणा देत निषेध केला. जालना शहरातील मामा चौकातून निघालेला हा मोर्चा फुलबाजार, नेहरू रोड, काद्राबाद, मुथा बिल्डींग, मस्तगड मार्गे गांधी चमन येथे विसर्जित झाला.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, आ. मनिषाताई कायंदे, आमदार अंबादास दानवे, शिवाजी चोथे,डॉ.हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर यांची भाषणे झाली. यावेळी झालेल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अत्यंत चांगले काम केले. त्यात शेतकरी कर्जमुक्ती, निसर्गिक आपत्तीत, कोरोनाचे महासंकट यांचा समावेश होतो. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मागील अडीच वर्षाच्या काळात सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चांगला राज्यकारभार केला. राज्यातील हे महाविकास आघाडीचे सरकार पडत नाही हे पाहून भाजपाने सरकार यंत्रणांचा गैरवापर करुन प्रचंड पैश्याचा वापर करुनही हे सरकार पडत नाही, नंतर आमदारांची फोडाफोडी करुन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कटकारस्थान संपुर्ण राज्यासह देशाच्याही निदर्शनास आले आहे. अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दुपारी बारा वाजता हा निघालेला मोर्चा दुपारी दोन वाजता प्रचंड उन्हात गांधीचमन येथे पोहोचला. तीव्र ऊन असतांनाही शिवसैनिकांनी जराही विचलित झाले नाहीत. रस्त्याने हा मोर्चा पुढे सरकत असतांना दुकानदार, ग्राहक हे आपुलकीने बघत होते. अत्यंत सुस्वभावी मुख्यमंत्र्यांना पदावरून काढण्याचा प्रयत्न विरोधकांनी करावयास नको होता. असे सामान्य माणसांचे मत दिसून आले. ज्या शिवसेना प्रमुखांनी राज्यात व देशात हिंदुत्व मनात रुजविले व हिंदूवरील अनेक कठीण प्रसंगातून बाळासाहेबांनीच अनेक वेळा वाचविले. त्या शिवसेनेबद्दल व हिंदुत्वाबद्दल भाजपाकडून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत हे एक मोठे आश्र्चयच आहे. रस्त्यावरुन जाणाNया मोर्चावर जागोजागी पुष्पवृष्टी केली. राज्यातील सामान्य जनता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी शिवसेनेचे मराठवाडा सचिव पटवर्धन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, मोहन अग्रवाल, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, उत्तमराव वानखेडे, मोहन मेघावाले, पंडीत भुतेकर,अ‍ॅड. भास्करराव मगरे, सविता किवंडे, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे,जावेद शेख, पेâरोज तांबोली, जाफरखॉन, बालासाहेब आबुज, भगवान कदम,माधवराव कदम, रमेश गव्हाड, रावसाहेब राऊत, परमेश्वर जगताप, हनुमान धांडे,बाबासाहेब तेलगड, विष्णु पाचपुâले, आत्मानंद भक्त, बाला परदेशी, दिपक रननवरे, बाबुराव पवार, संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, अशोक बरर्डे, उध्दव मरकड, अशोक आघाव, अजय अवचार, वैâलास चव्हाण, गणेश डोळस, बबन खरात, यादवराव राऊत, खालेद कुरेशी, सुधीर पाखरे, भगवान शिंदे, जनार्धन चौधरी, राम काळे, पांडूरंग डोंगरे, रवि बोचरे, घनश्याम खाकीवाले, विजय पवार, प्रभाकर पवार, अशोक पवार, निखिल पगारे, नरेश खुदभैये, दिपक राठोड, मनोज लाखोले, चेतन भुरेवाल, दुर्गेश काठोठीवाले, रमेश टेवूâर, जगदीश रत्नपाखरे, अनिल अंभोरे, लखन कनिसे, भरत कुसुदल, अमोल ठाकुर, अजय कदम, विनायक चोथे, योगेश रत्नपारखे, राजु सलामपुरे, मुरली शेजुळ, हरिहर शिंदे, संताजी वाघमारे, जगनाथ चव्हाण, कांतराव रांजणकर, रविकांत जगधने, दिनेश फलके, प्रभाकर घडलिंग, सखाराम गिराम, महेश पुरोहित, भगवान अंभोरे,काशिनाथ जाधव, बाबुराव कायंदे,रामकिसन कायंदे, राजु माधोवले, भुषण शर्मा, वुंâडलिक मुठ्ठे, दिपक वैद्य, सखाराम लंके, मुसा परसुवाले, कमलेश खरे, दिनकर चोरमारे, संतोष खरात, राधाताई वाढेकर, मंजुषा घायाळ, आशा पवार, मंगल मिटकर, पुजा टेहेरे, संगिता नागरगोजे, शांता गुंजकर, सिमा पवार, घोडके ताई, रंजना ताई, गोपी गोगडे, गणेश घुगे, संतोष जांगडे, संदीप नाईकवाडे, राम सतकर यांच्यासह उपतालुकाप्रमुख, आजी-माजी जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, न.प. सदस्य, बाजार समिती सदस्य, पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख यांच्यासह हजारो शिवसैनिक, युवासैनिक, सर्वसामान्य नागरिकांची उपस्थिती होती. उध्दव साहब तुम आगे बढो….हम तुमारे साथ है… प्रचंड घोषणाबाजीने शहर दणाणले या मोर्चात सामील झालेल्या शिवसैनिक आणि पदाधिकाNयांच्या भावना संतप्त होत्या. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद….हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद…. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ हैं. अशा गगनभेदी घोषणा देत गद्दार आमदारांचा कडकडून निषेध व्यक्त केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *