ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

March 14, 202212:46 PM 37 0 0

उरण दि 13(संगीता ढेरे ) : सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब, गरजू मुलांना दररोज एकवेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते.सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी व त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरु केले. ते आजही अखंडपणे सुरु आहे.

अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदत करीत असतात. तर अनेक व्यक्ती आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तर काही व्यक्ती विविध सणांचे औचित्या साधून चारफाटा येथे सुफल आहाराच्या माध्यमातून अन्नदान करीत असतात.अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उरण मधील पोलीस बांधवांनी आपल्या स्व खर्चातून झोपडपट्टी येथील मुलांना मोफत अन्नदान केले. सपोनि अनिरुद्ध गिजे, पोलीस नाईक -धीरज पाटील, पोलीस नाईक -युवराज जाधव, पोलीस नाईक -कातकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अशा पोलीस बांधवांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे मत उरण मधील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *