उरण -रायगड (तृप्ती भोईर) : कोकणचा विकास होण्यासाठी योगदान दिलेल्या नेत्यांच्या नावात बॅ. ए. आर अंतुले याचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. रायगड वासियांना म्हणजेच कोकणात सर्वत्र उद्योगधंदे आणुन तेथील तरुणाईला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभुमीचे नाव रायगड जिल्हा असे केले. केंद्रीय आरोग्यमंत्री असताना देशातील पोलीओ डोसच्या लसीकरणाचा आरंभ केला. असे अनेक धाडसी निर्णय अंतुले साहेबांच्या काळात घेण्यात आले होते. एकुण काय तर खऱ्या अर्थाने कोकणचा विकासाचे भाग्यविधाते म्हणून त्यांचे नाव आपल्याला घेता येईल. अशा या माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय मंत्री बॅ. ए.आर अंतुले साहेबांचे नाव या उरण – शिवडी -न्हावा या सागरी सेतूला देण्यात यावेशी मागणी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी महसुली मंत्री बाळासाहेब थोरात याच्याकडे केली.
अंतुले साहेब हे फक्त रायगड पुरतेच मर्यादित नव्हते तर ते एक राष्ट्रीय नेते होते अशा राजकीय नेत्याचा उचित सन्मान व्हावा व त्यांचे नाव अजरामर व्हावे या हेतूने महेंद्र घरत यांनी आपली मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली. या मागणीचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन करून महेंद्र घरत यांनी केलेल्या मागणीचा विचार व्हावा असे पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे देण्यात आले.
Leave a Reply