ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ऊरण सामाजीक संस्थेने मा. मुंबई उच्च न्यायालय आणि मा. राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे दाद मागणार

October 21, 202114:12 PM 41 0 0

उरण संगिता पवार ) : कंपनीकडून त्यांच्या बंदरालगतच्या खारफुटीची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे आणि सदरहू तोडलेली झाडे करंजा – खोपटा खाडीत बेकायदेशीररित्या टाकली जातात .त्यामूळे वरील पार्श्वभूमिवर संबंधित कंपनीवर उचित कारवाई न झाल्यास उरण सामाजीक संस्थेने मा. मुंबई उच्च न्यायालय आणि मा. राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे . आसे संस्थेचे आध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सांगीतले आहे. या बाबत बोलताना संस्थेचे सरचिटणीस संतौष पवार म्हणाले, बंदरालगतच्या खारफुटीची मोठ्या प्रमाणावर करंजा टर्मिनल लॉजिस्टिक प्रा लि . करंजा , ता. उरण या कंपनीकडून कत्तल होत आसल्याचे आणि सदरहू तोडलेली झाडे करंजा – खोपटा खाडीत बेकायदेशीररित्या टाकली जातात अशी खात्रीलायक माहिती मिळताच उरण सामाजिक संस्थेने दि २७.९.२०२१च्या पत्रान्वये याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी रायगड , तहसिलदार उरण ,उप वन संरक्षक अलिबाग, वनक्षेत्रपाल कांदळवन अलिबाग , यांच्याकडे केली . त्याची दखल घेऊन तहसिलदार, उरण यांच्या आदेशानुसार २९.९.२०२१ रोजी वरील खात्यांचे प्रतिनिधी , कंपनी प्रतिनिधी आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या साक्षीने सदरहू बंदर लगतच्या परिसराची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली .


सदरहू पाहणी दरम्यान असे आढळून आले कि , सदरहू बंदराच्या पूर्वेकडील बाजूस काही अंतरावर तोडलेल्या खारफुटी झाडांचे सात मोठे ढिगारे समुद्रात पडून आहेत , तसेच बंदराच्या पुर्व बाजूच्या धक्क्यालगत सुमारे १०० मीटर लांब आणि १५ फूट रुंदीच्या भागातील खारफुटीची झाडे तोडून त्या झाडांचा नामोनिशाणा राहू नये म्हणून जेसीबी किंवा तत्सम यंत्राच्या सहाय्याने तो भाग पूर्ण खोदलेला आहे असे दिसून आले आहे . परंतु त्याच भागाला लागून असलेल्या दक्षिणेकडील बाजूस सुमारे १०० खारफुटीच्या तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसून आले . सदरहू तोडलेली झाडे टगच्या सहाय्याने समुद्रात फेकली जातात त्यामुळे मच्छिमारांचेही नुकसान झाले आहे असेही संस्थेने अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले . तसेच बंदरात साठवलेल्या कोळशाच्या ढिगार्यातून काळे पाणी झिरपून समुद्रात सोडले जात आहे , असेही निदर्शनास आले. सदरहू स्थळ पाहणीचा पंचनामा झालेला आहे . उरण सामाजिक संस्थेने दि. ४/५ ऑक्टो. रोजी एक टग खारफुटीच्या झाडांची मोट पाठीमागे बांधून समुद्रातून जात असल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ तहसिलदार उरण यांना दाखवला आणि फॉर्वर्ड केला .असे असतानाही तहसिलदार उरण कार्यालयाकडून उरण पोलीस स्टेशनमद्ये सदरहू प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंदवला आहे अशी आश्चर्यकारक माहिती मिळाली आहे .वस्तुत: संस्थेने सदरहू करंजा टर्मिनल विरोधात लेखी तक्रार केली आहे . त्यामुळे कंपनीच्या नावावर गुन्हा नोंदवणे आवश्यक होते . त्यामुळे कोण कुणाची पाठराखण करत आहे याचा उलगडा होत नाही . जिल्हाधिकारी रायगड यांच्या कडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार सदरहू कंपनीस खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिलेली नाही . करंजा-खोपटा खाडीत मच्छीमारी करणार्या काही मच्छीमारांनी उरण पोलीस स्टेशनमद्ये दि १३.१०.२०२१ च्या पत्रकान्वये सदरहू कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी केली आहे , सदरहू पत्रात त्यांनी दि २२.९.२०२१ रोजी एक टग खारफुटीच्या तोडलेल्या झाडांची मोट पाठीमागे बांधून करंजा बंदरातून चाललेला आहे असे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिग उरण पोलीस स्टेशनला सादर केले आहेत . सदरहू टगचा नोंदणी क्रमांक आणि टग वरील व्यक्तीचे नावही पत्रात नमूद केले आहे .
महसूल, वनविभाग, पोलीस , बंदर खाते इ. विभागांची कार्यालये केवळ ४-५ कि. मी. च्या अंतरावर असताना एखादी कंपनी दिवसाढवळ्या असे धाडस कसे करू शकते याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे .त्यामुळे खारफुटीच्या झाडांची बेसुमार तोड , त्यामुळे पर्यावरणाची झालेली अपरिमित हानी आणि गरीब मच्छीमारांचे झालेले नुकसान याबाबत काय सक्त कारवाई केली जाते याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे .
करंजा बंदरालगतच्या खारफुटीच्या कत्तलीबाबत वनविभाग उरण तर्फे पंचनामा केला आसून तो पंचनामा मा.तहसिलदार तथा दंडाधीकारी उरण यांना पाठवीला आहे.त्यांनी त्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.
शशांक कदम— वनपरीक्षेत्र अधिकारी उरण

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *