ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण चा पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांसाठी पर्वणी

November 10, 202116:49 PM 77 0 0

उरण संगिता (पवार ) : मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरील बीच हे गर्दीच्या ठिकाणी आहेत त्यामुळे तेथील बीच सोडले तर पर्यटकांना उरण पिरवाडी बीच हा जवळचा आहे त्यामुळे या नविमुंबई ,ठाणे ,पनवेल ,कल्याण, डोंबिवली,कर्जत खोपोली ,या परिसरातील तसेच स्थानीक उरण परिसरातील जनता पर्यंटनाससाठी येत आहेत.

उरणला तसे चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे.परंतु पिरवाडी बीच हा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे.समोरच पूर्वेला द्रोणागिरी हा भला मोठा डोंगर उभा आहे.आजूबाजूला परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे.तसेच समुद्राचे पाणी ही नितळ असल्याने पर्यटक आपला आनंद पाण्यामध्ये मनमुराद पणे तुटत आहे लहान मुले तसेच मोठी मंडळी ही वाळू मध्ये खेळण्याचा आनंद लुटत आहेत मन मोकळे पणाने आनंद लुटण्यास मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा या उरणच्या पिरवाडी समुद्रावरील बीच कडे वाढत आहे .
सद्यस्थितीत या उरणच्या पिरवाडी बीच कडे पर्यटकांचा ओढा वाढत असताना इथे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तसा विकास झालेले नाही बीच कडे दुर्लक्ष झालेले आहे.काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. या बाबीं कडे जर शासनाने लक्ष केंद्रित केले तर हा पिरवाडी बीच जर सुसज्ज बनविला तर आणखी पर्यटकांचा ओढा या बीच वर वाढला जाऊन स्थानिकांना रोजगार ही उपलब्ध होऊन आणखी कुटुंब यावरती चालतील त्यामुळे शासनाने या कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *