ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मा.नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांचा जे.एन.पी.टी.-सिडको परीसरामध्ये पाहणी दौरा संपन्न

September 30, 202113:27 PM 50 0 0

उरण दि २९(संगीता ढेरे ) ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सदर प्रश्न सोडविण्या संदर्भात संबधित विभागाला मंत्री महोदयांनी दिले आदेश बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री, मा.एकनाथजी शिंदे यांनी उरण तालुक्यातील शिवस्मारक, जे.एन.पी.टी. येथे भेट दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मा.मंत्री महोदयांचे स्वागत केले. सदर पाहणी दौरा हा ठाणे-बेलापूर रस्त्यावरील सिडको व जे.एन.पी.टी. कडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी तसेच पार्किंग प्रश्न यावर कशाप्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्यात ज्यामुळे ट्राफिक व पार्किंग प्रश्न सुटेल यावर मंत्री महोदयांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी माजी जिल्हाप्रमुख/विश्वस्त जे.एन.पी.टी. दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विधानसभा संघटक सदानंदराव भोसले, तालुकासंघटक बी.एन.डाकी, शिवसेना गटनेता गणेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुकासंघटक के.एम. घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, विभागप्रमुख संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, तालुका युवासेना अधिकारी हितेश पाटील, वैद्यकीय कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका भावना म्हात्रे, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तसेच सिडको चे अधिकारी वर्ग, जे.एन.पी.टी. चे अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग, तहसिलदार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपतालुकासंघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.मंत्री एकनाथ शिंदे यांनी उरण तालुक्यातील जे एन पी टी परिसरातील वाहतूक व इतर समस्यांची पाहणी केली त्यामुळे उरण तालुक्यातील महत्वाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *