ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना जामीन मिळतो, तर ‘कोविड’ने आजारी पू. आसारामजी बापू यांना का नाही ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्‍न

May 8, 202112:57 PM 47 0 0

पू. आसारामजी बापू यांना कारागृहात कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने जोधपूर येथील महात्मा गांधी रूग्णालयात हलवण्यात आले, यातून राजस्थान सरकारचा गलथानपणाच दिसून येतो. 80 वर्ष वय असलेल्या आणि अनेक आजारांशी लढत असलेल्या बापूजींची कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे. सरकारी यंत्रणा त्यांची पुरेशी काळजी घेईल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे त्यांना योग्य आणि तातडीने उपचार मिळावेत, तसेच त्यांना तातडीने जामीन मंजूर करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.

 

महाराष्ट्रात अनेक कारागृहांत कोरोनाचा संसर्ग पसरल्याने शासनाने अनेक कैद्यांना जामीन मंजूर करून मुक्त केले. शहरी नक्षलवादी वरवरा राव यांच्यावर तर पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप असतांनाही त्यांचे वय आणि आजारपण पहाता त्यांना जामीन मिळाला; मग प.पू. बापूजी यांना तर कोरोना झाला आहे, तरी त्यांना जामीन का मिळू नये, असा प्रश्‍न निर्माण होतो. पू. बापूजींना कोरोना झाल्यावर त्वरीत रुग्णालयात न हलवता चार दिवसांनी अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात का हलवले जाते ? यातूनच शासन हिंदु समाज आणि हिंदु संत यांच्याबद्दल संवेदनहीन आहे, हेच दिसून येते.

हिंदु जनजागृती समिती पू. आसारामजी बापू यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते. पू. आसारामजी बापूंना शीघ्रातीशीघ्र चांगल्या रुग्णालयात उपचार मिळावेत आणि त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *